अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यामध्ये पारा खाली जाताच थंडी जोर धरू लागते. अशामध्ये डॉक्टरांनी आरोग्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर म्हणतात की थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जास्तकरून हृदयाच्या आजारांशी निगडित आहेत त्यांना जास्त सावध राहण्याची गरज आहे.
त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणे धोक्याचे ठरू शकते. हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर केके अग्रवाल यांनी सांगितले की तापमान खूपच कमी झाले तर धमन्या आखडू लागतात यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्याबरोबर अस्थमाच्या रुग्णांसाठी डोकेदुखी वाढू शकते.
त्यामुळे या दिवसांमध्ये आहारात थंड पदार्थांचा उपयोग करणे टाळावे. ब्लड प्रेशर, अस्थमा, मधुमेह यासारख्या रूग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहार आणि औषधे घ्यावीत याशिवाय सकाळी मॉर्निंग वॉकला जाणे सुद्धा टाळावे. त्याचबरोबर डॉक्टरांचे म्हणणे आहे की थंडीमध्ये लोकां समोर दोन प्रकारच्या अडचणी असतात एक कमी तापमानाची आणि दुसरी धुळीची.
थंडीच्या दिवसांमध्ये धूळ जास्त वरती जात नाही. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढते यामुळे थंडीमध्ये सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे गळ्याचे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे 40 ते 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
यासाठी प्रतिदिवस सहा ते आठ ग्लास कोमट पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्हाला एखाद्या डॉक्टरने कमी पाणी पिण्याचे पिण्याचा सल्ला दिला असेल तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपला आहार आणि सेवन ठेवले पाहिजे.