Shani Gochar 2024 : शनि हा प्रत्येक व्यक्तीला कर्मानुसार फळ देतो. शनी हा आरोग्य आणि जीवनाशी संबंधित आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात या ग्रहाला विशेष महत्त्व आहे, कुंडलीत शनीची प्रबळ स्थिती माणसाचे जीवन सुख-समृद्धीने भरते. प्रत्येक कामात यश मिळते. व्यवसायात नफा होतो.
शनि हा असा ग्रह आहे जो सर्वात कमी वेगाने चालतो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्षे लागतात. सध्या शनी कुंभ राशीत आहे.
आणि 29 जून रोजी, शनी स्वतःच्याच राशीत उलट्या दिशेने चालेल, म्हणजेच तो विरुद्ध दिशेने वाटचाल करणार आहे. या काळात शुभ आणि अशुभ असा प्रभाव सर्व राशींवर पडेल. पण अशा काही राशी आहेत, ज्यांना या काळात फायदा होईल. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया….
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी स्थिती खूप शुभ मनाली जात आहे. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना चांगले फळ मिळेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. उत्पन्न वाढेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
मेष
मेष राशीच्या लोकांवर शनिदेव कृपा करतील. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. पदोन्नती मिळू शकते. पगारही वाढेल. गुंतवणुकीतून लाभ होईल. कुटुंबात समृद्धी येईल. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करता येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनाही शनीच्या उलट्या हालचालीचा फायदा होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो.