Grah Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ आणि शनि या दोन्ही ग्रहांना विशेष स्थान देण्यात आले आहे. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती निर्भय आणि धैर्यवान बनते. जीवन आनंदी राहते. तसेच करिअर आणि व्यवसायात यश मिळते. भाऊ-बहिणीचे संबंध चांगले राहतात, आत्मविश्वास आणि आदरही वाढतो. शनिदेवाच्या शुभेच्छेमुळे व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात लाभ होतो.
शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. दरम्यान, मंगळ 1 जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि 12 जुलैपर्यंत तो येथेच राहणार आहे. अशास्थितीत मंगळ ग्रहावर शनीची तिसरी दृष्टी पडत आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येणार आहे. काहींना फायदा तर काहींना नुकसान होणार आहे. पण आज आम्ही अशा तीन राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना या काळात खूप लाभ होणार आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात लाभ मिळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. प्रवासाची शक्यता आहे. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
मेष
हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी देखील खूप शुभ मानला जात आहे. आरोग्याचा लाभ होईल. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. जुन्या मित्राची भेट होईल. आरोग्य उत्तम राहील. समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी, शनि आणि मंगळाच्या संयोगामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. अडकलेला पैसा परत येईल. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही फायदा होईल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. पैशाशी संबंधित समस्या संपतील.