Shani Ast 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रात शनि हा जीवन, परिश्रम आणि आरोग्याचा कारक मानला जातो. शनिदेवाला कलियुगाचा दंडाधिकारी आणि कर्माचा दाता असेही म्हटले जाते. शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार चांगले-वाईट फळ देतात, कुंडलीत शनीची मजबूत स्थिती लोकांसाठी सुख आणि सौभाग्याची शक्यता निर्माण करते.
त्याच वेळी, या ग्रहाची वाईट नजर एखाद्याला उच्च स्थानावर जमिनीवर आणून पाडते. दरम्यान, 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत शनि कुंभ राशीत मावळेल. ज्याचा प्रभाव 38 दिवस टिकेल. शनीच्या या चालीतील बदलामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. पण 3 राशींना याचा सर्वाधिक फायदा होईल. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी चला पाहूया…
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती खूप शुभ मानली जाते. या काळात कुटुंबात समृद्धी येईल. करिअरमध्ये प्रगती होईल. पगारात वाढ होईल. अचानक आर्थिक लाभ होईल. या काळात नवीन संधी निर्माण होतील.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना 38 दिवस लाभ होईल. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. वैयक्तिक जीवन देखील आनंदाने भरलेले असेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. एकूणच येणारा काळ उत्तम मानला जात आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांवर वर्षभर शनि देवाची कृपा राहील. मेहनतीचे गोड फळ मिळेल. पदोन्नतीचे योग येतील. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात, पण अडचणींवर मात करू शकाल. तुम्हाला धन-धान्य मिळेल.