Shani Dev : जोतिषात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व आहे. नऊ ग्रहांपैकी शनिदेवाला महत्वाचे स्थान आहे. शनिदेवाला न्यायाचा देवता मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये शनिला कर्मकार, कर्मफल आणि न्यायाचा स्वामी मानले गेले आहे. शनीचा प्रभाव व्यक्तीच्या कृतींवर आधारित असतो. शनिदेवाला अडचणी आणि मेहनतीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की शनिदेवाची क्रूर नजर एखाद्या व्यक्तीवर पडल्यास त्याच्या जीवनात अडचणी वाढतात अशास्थितीत लोकं त्यांची पूजा करून त्याचा प्रभाव दूर करण्याचा प्रयत्न करतात.
दरम्यान, 2025 पर्यंत म्हणजेच अडीच वर्षांपर्यंत शनी कुंभ राशीत राहणार आहेत. मात्र, याआधी 2024 मध्ये तो एकदा नव्हे तर तीनदा आपली हालचाल बदलणार आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे, मात्र, शनिदेवाच्या हालचालीत होणारा हा बदल 2 राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. चला या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जात आहे. या काळात शनिदेव वर्षभर तुमच्यावर कृपा करणार आहेत. समाजात तुमच्या कार्याबद्दल आदर आणि सन्मान वाढेल. त्याच वेळी, नोकरीमध्ये देखील बढतीची शक्यता आहे. याशिवाय जर तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो आहे. या काळात तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. परस्पर संबंध अधिक दृढ होतील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांवरही शनिदेवाच्या चालीचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. या काळात शनिदेवच नाही तर देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा राहील. या काळात वर्षभर सुख-समृद्धी वाढेल. तसेच बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. याशिवाय जमीन, घर, बंगला, कार खरेदीसाठी ही वेळ खूप चांगली मानली जात आहे. त्याच वेळी, जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय करू शकता. हा काळ चांगला आहे. या काळात तुमचे सर्व प्रयत्न पूर्ण होतील. तसेच तुम्ही आनंदी राहाल.