Shani Dev : शनिदेव हा सर्वात संथ गतीने चालणार ग्रह मानला जातो. सध्या शनी स्वतःच्या म्हणजे कुंभ राशीत स्थित आहे. अशास्थितीत त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येत आहे, अशातच सध्या शनी स्वतःच्या राशीत नवा राजयोग निर्माण करत आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. या काळात कुंभ राशीत दोन मोठे राजयोग तयार होणार आहेत, ज्यात शश राजयोगाचाही समावेश आहे.
शनिदेव आधीच कुंभ राशीत विराजमान आहेत, जेथे ते 2025 पर्यंत राहतील. त्याच वेळी या राशीत बुध आणि सूर्याचे संक्रमण होणार आहे. ज्यामुळे बुद्धादित्य योग तयार होईल. या शुभ राजयोगाने लोकांच्या जीवनात सुवर्णकाळ सुरू होईल. तसेच काही राशींना विशेष परिणाम मिळतील, कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी शाश राजयोग आणि बुद्धादित्य योग खूप फायदेशीर मानला जात आहे, या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील, ज्यामुळे मानसिक चिंता दूर होईल. शनिदेवाच्या कृपेने सर्व वाईट गोष्टी दूर होतील.
मेष
हा राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. याशिवाय प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळेल. करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ असेल. कुटुंबातील आरोग्याची चिंता संपेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग खूप फलदायी ठरणार आहे. या काळात लोकांच्या जीवनात मोठा बदल दिसून येईल. तसेच धार्मिक कार्यात रस वाढेल, दीर्घकाळ प्रलंबित निधी प्राप्त झाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो आहे. या काळात सर्व कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जर तुम्ही खूप दिवसांपासून कार, बंगला किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. या काळात तुम्ही शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करू शकता. मात्र, त्याआधी तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचे मत अवश्य घ्या. परदेश प्रवास करता येईल. याशिवाय नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.