लाईफस्टाईल

Share market today : सहा महिन्यातली सर्वात मोठी घसरण ! गुंतवणूकदारांचं ४.५ लाख कोटींचं नुकसान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- काल २७० अंकांनी घसरलेला शेअर आज तब्बल ११५९ अंकांनी घसरला आहे. बाजार सुरू होताच ३०० अंकांनी घसरलेला सेन्सेक पुन्हा सावरू शकलाच नाही.

बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्सची ११५९ अंकांनी घसरण होऊन तो शेवटी ६० हजारांच्या खाली स्थिरावला. शेवटी सेन्सेक्सचा आकडा ५९ हजार ९८५ अंक इतका खाली आला होता.

सेन्सेक्स जवळपास १.७ टक्क्यांनी खाली उतरल्यानंतर निफ्टीमध्ये देखील जवळपास १.७७ टक्क्यांची घट दिसून आली. निफ्टी जवळपास ३२२ अंकांनी खाली येऊन १७ हजार ८५७ अंकांवर स्थिरावला.

दरम्यान, शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांचं तब्बल ४.५ लाख कोटींचं नुकसान झाल्याची माहिती रिलायन्स सेक्युरिटीजचे स्ट्रॅटेजी प्रमुख विनोद मोदी यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.

हेवीवेट फायनान्स आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या घडामोडींमुळे देशांतर्गत इक्विटीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारात दिसून आला, असं देखील ते म्हणाले.

जागतिक स्तरावर कमकुवत ट्रेंडदरम्यान मासिक फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागातील पोझिशन्स सेटलमेंटच्या शेवटच्या दिवशी चांगल्या विक्रीमुळे ही घसरण झाली.

दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स 61081 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला आणि 59,777.58 अंकांच्या नीचांकी पातळीवर आला.

आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि एचडीएफसी बँक मोठ्या प्रमाणात घसरले.सर्व प्रमुख विभागनिहाय निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी पीएसयू बँक (सार्वजनिक क्षेत्रातील बँक) 4 टक्क्यांहून अधिक घसरली

Ahmednagarlive24 Office