साहित्य : 1 वाटी जाडी लाल शेव, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 2-3 चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चिमूट भर हळद, मीठ चवीप्रमाणे.
कृती: प्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करुन चिरलेला कांदा चांगला परतून घ्या.
त्यामधे घरगुती मसाले, आले-लसूण पेस्ट, कढीपत्त्याची पाने, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस व शेव टाकून गॅस मंद आचेवर ठेवा.
त्यात थोडं पाणी टाकून भाजी अर्धा ते एक मिनीट सावकाश परतून घ्या. त्यावर चिमूटभर चाट मसाला टाकून घ्या.त्यात शेव टाकून गॅस बंद करा.
चवी प्रमाणे कोथिंबीर घालू शकता, सर्व्ह करण्याची तयारी असल्यावरच शेव घाला.