अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- एनसीबीने 2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर छापा मारला आणि यात आर्यन खान आणि हिरोईन व अन्य तरुण तरुणी रेव्ह पार्टी करत होते.
आर्यनसोबत त्याचा मित्र अरबाज खान आणि मुनमुन धमेचाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले होते. ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या मुनमुन धामेचा हिच्याबाबतीत एक मोठा खुलासा समोर आला आहे.
मुनमुनने सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपविल्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या महिला अधिकाऱ्यांनी सॅनिटरी पॅडमधून ड्रग्ज काढल्याचा हा व्हिडिओ आहे.
अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान याची मुनमुन ही मैत्रिण आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीवेळी ती उपस्थित होती. अरबाजने त्याच्या बुटात ड्रग्ज ठेवलेले तर मुमुन धमेचाने सॅनिटरी पॅडमधून ड्रग्ज क्रूझवर नेले होते.
एनसीबीने ती त्या रुममध्ये होती तिथे तिच्याकडून ड्रग्ज हस्तगत करण्यात आल्याचे सांगितले होते. हे ड्रग्ज तिने सॅनिटरी पॅडमधून नेल्याचे सांगण्यात आले होते.
आता सोशल मीडियावर क्रूझवरील मुनमुन धमेचाच्या खोलीतून ड्रग्ज सापडलेल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुणी सॅनिटरी पॅड रुममधील कार्पेटवर ठेवून त्यातून ड्रगची गोळी बाहेर काढताना दिसत आहे.
सॅनिटरी पॅडमध्ये कागदाच्या पुडीत ड्रग्ज लपविण्यात आले होते. एनसीबीनेच हा व्हिडिओ काढल्याचे बोलले जात आहे. मुनमुन ही एक मॉडेल आहे.
ती एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. अनेक सेलिब्रेटींबरोबर तिची ओळख आहे. त्यामुळे अनेक पार्टींमध्ये ती सेलिब्रेटींसमवेत दिसते