Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचे परिणाम माणसाच्या जीवनात दिसून येतात. म्हणूनच ग्रहांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्व दिले जाते. अशातच सुख, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक शुक्र कन्या राशीत प्रवेश करत आहे आणि 30 नोव्हेंबर रोजी स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. या काळात शुक्र 12 नोव्हेंबरला हस्त आणि 24 नोव्हेंबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्याचा काही राशींवर परिणाम दिसून येणार आहे.
शुक्राच्या संक्रमणामुळे उघडेल ‘या’ राशींचे भाग्य !
मकर
शुक्राचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. तूळ राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे नोकरदारांना बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. या काळात व्यावसायिकांना आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. तसेच करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. या काळात मोठा करार निश्चित होऊ शकतो. फिल्म लाईन, मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंग, अभिनय, कला आणि संगीत या क्षेत्राशी निगडित लोकांसाठी ही वेळ उत्तम राहील. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदीचा योग आहे.
कर्क
शुक्राचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. वाहन आणि मालमत्ता खरेदीचा योग आहे. आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकतात. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल.
मिथुन
तूळ राशीत शुक्राचे होणारे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे. या काळात प्रेमसंबंधात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात मोठी संधी मिळेल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. एकूणच येणारी वेळी खूप लाभदायक आहे.
मेष
शुक्राच्या राशीत होणारा बदल मेष राशीच्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. या काळात परदेश प्रवासाची शक्यता आहे. अभ्यासाच्या क्षेत्रात भरीव यश मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही शुभ कार्य देखील घडू शकते. या काळात वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.