लाईफस्टाईल

Shukra Uday 2023 : शुक्राच्या उदयामळे चमकेल ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य, ऑक्टोबरपर्यंत राहील लक्ष्मीची कृपा…

Published by
Renuka Pawar

Shukra Uday 2023 : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह खूप महत्वाचा मानला जातो. सुख समृद्धीचा प्रतीक असलेला शुक्र कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.17 वाजता कर्क राशीत उदयास आला आहे. ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे, जो अनेक राशींसाठी भाग्यवान ठरेल, शुक्राचा कर्क राशीतील उदय खूप फायदेशीर ठरणार आहे. शुक्राच्या उदयामुळे काही राशींचे भाग्य चमकणार आहे.

जेव्हा राहु मेष राशीत असतो आणि गुरु त्याच वेळी मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होतो. या योगाच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव इत्यादी राहतात. गजलक्ष्मी योग कोणत्याही राशीत बनतो, या काळात शनीची साडेसाती संपते आणि धन आणि सुखात वृद्धी होते.

शुक्राचा उदय ‘या’ राशींसाठी असेल फलदायी :-

मेष

शुक्राच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळेल. अनेक अडचणी दूर होऊ शकतात. कुटुंबात समृद्धी येईल. मालमत्ता आणि वाहन खरेदीचा योग आहे. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात यश मिळेल. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे.

कर्क

शुक्राचा उदय या राशींसाठी फलदायी आहे. या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगली आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. कर्क राशीच्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल. यावेळी तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. वैवाहिक जीवन आनंदी असेल. तुम्ही एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करू शकता ज्यामध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना शुक्राचा उदय लाभदायक ठरेल. कामात यश मिळेल. शुक्राच्या संक्रमणाने तयार झालेल्या गजलक्ष्मी राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना अधिकाधिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या कालावधीत केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थितीत वाढ होईल. मार्केटिंग, शिक्षण, मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात लाभ मिळू शकतो.

कन्या

शुक्राचा उदय खूप शुभ असू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. त्याचवेळी लोकांना गजलक्ष्मी राजयोगाचा विशेष लाभ होईल. या काळात प्रगतीचे नवीन संधी मिळतील. पदोन्नतीचीही शक्यता आहे, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होईल आणि जोडीदारासोबत चांगला ताळमेळ राहिल्याने वैवाहिक जीवन सुखी होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील, व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीचे मार्ग खुले होतील आणि तुम्हाला नफा मिळेल.

कुंभ

या राशीत शुक्र सहाव्या भावात उगवत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मात्र आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. मालमत्ता, वाहन, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Renuka Pawar