Side Effects of Almonds : बदामाचे अतिसेवन तुमच्यासाठी ठरू शकते घातक; वाचा सविस्तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Side Effects of Almonds : ड्रायफ्रूट्सचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ड्रायफ्रूट्समध्ये बदामाला जास्त महत्व आहे. बदाम हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. बदामामध्ये प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ई, के, झिंक आणि फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

बदामाचे नियमित सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. तसेच बदाम खाल्ल्याने शरीर उबदार राहते. त्यामुळे हिवाळ्यात बदामाचा वापर वाढतो. पण बदाम जरी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी देखील त्याचे जास्त सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. याचे जास्त सेवन केल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसानच होते. याच्या अतिसेवनाने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अतिसेवन टाळावे. चला जाणून घेऊया बदामाचे जास्त सेवन केल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात.

बदामाच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात ‘या’ समस्या !

बद्धकोष्ठता समस्या

बदाम जास्त प्रमाणात सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. त्यामुळे शरीराची पचनशक्ती बिघडते. त्यामुळे लूज मोशन आणि गॅसची समस्या निर्माण होते.

वजन

बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या वाढते. यातील कॅलरी आणि फॅट्स वजन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका वाढतो. दिवसभरात 5-6 पेक्षा जास्त बदामांचे सेवन केल्यास ते फायद्याऐवजी त्रासाचे कारण बनते.

ऍलर्जी समस्या

जर तुम्ही बदाम जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे तुमच्या शरीरात अनेक प्रकारच्या ऍलर्जी होऊ शकतात. याच्या अतिसेवनाने खाज येणे, जिभेला सूज येणे इत्यादी समस्या उद्भवतात.

रक्तस्त्राव समस्या

जर तुम्ही बदामाचे जास्त सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई लाभाऐवजी नुकसान करते. जे रक्तस्रावाच्या समस्येचे कारण बनते.