मोबाईल पाहत टॉयलेटला बसला अन अजगराने केले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- तो आला.. टॉयलेटला गेला.. मोबाईल पाहायच्या नादात टाच बसला.. जेव्हा गुप्तांगाची आग झाली तेव्हा उठला.. आणि त्यानंतर त्याने जे पहिले ते पाहून जीव जायची वेळ आली..

एका अजगराने त्याच्या पायाला वेढा टाकून त्याच्या गुप्तांगाला चव घेतला होता.. ही भयानक घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. शिराफोप मासुकरात असं या तरुणाचं नाव आहे.

थायलंडमधल्या नोंनथांबुरी भागात तो राहायला आहे. सविस्तर हकीगत अशी: सदर तरुण टॉयलेटला गेला.

गुप्तांगाच्या इथे जळजळ का होते आहे हे पाहण्यासाठी जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याला रक्त पडलेलं दिसलं. आपल्या गुप्तांगाला इजा झाली असून त्यामुळेच हे रक्त गळत असल्याचं त्याला कळालं.

त्याने नीट पाहिल्यानंतर त्याला दिसलं की त्याच्या गुप्तांगाचा एका अजगराने चावा घेतला आहे. अजगराने त्याच्या मांडीला वेढा घातला होता आणि तो जोरात चावला होता.

भेदरलेला शिराफोफने सापाला झटकला आणि आहे त्याच अवस्थेत बाथरूमच्या बाहेर पळ काढला. शिराफोफच्या आईने आपात्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला आणि मुलाला बांग याई रुग्णालयात दाखल केलं.

डॉक्टरांनी शिराफोफवर उपचार केले असून तो सध्या ठीक आहे. अजबर विनविषारी असल्याने शिराफोफला फार त्रास झाला नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24