…तर राज्यातील प्रत्येक घराला वर्षाला 3 सिलिंडर मोफत मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  देशामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच निवडणुका म्हंटल्या की जनतेसाठी नेतेमंडळींकडून तसेच पक्षाकडून मोठमोठ्या घोषणा व पोकळ आश्वासने हे नेहमीची असतात.

यातच देशातील यंदाच्या निवडणुका पाहता मतदार राजांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी पक्ष आकर्षक घोषणा करत आहे. अशीच एक घोषणा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

राज्यातील गृहिणींवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील प्रत्येक घराला वर्षाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन भाजपने आपल्या संकल्पपत्र दिले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या 22 कलमी संकल्प पत्राचे प्रकाशन झाले. संकल्प पत्रातून सर्व गोमंतकीयांसाठी घरे देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

पात्र कुटुंबांना महिलांसाठी दोन टक्के, तर पुरुषांसाठी चार टक्के व्याजदराने गृहकर्ज देऊन, तसेच निवासी भूखंड विकसित करून पुढील पाच वर्षांत सर्व गोमंतकीयांसाठी चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देऊ, असे भाजपने या संकल्प पत्रात नमूद केले आहे.

भाजपने नेहमीच गोव्यावर भर दिला आहे. समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचणार्‍या आर्थिक लाभांसह उच्च विकासाचे आश्वासन भाजपने या संकल्प पत्रात दिले आहे.

भाजपचे गोवा संकल्प पत्र हा समाजातील सर्व घटकांना अधिक उन्नत करण्याचे वचन देणारा सर्वसमावेशक जाहीरनामा आहे, असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले.