उभे राहून पाणी पिताय? येऊ शकतो हार्ट अॅटॅक..जाणून घ्या..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- आपल्या शरीरास पाण्याची नितांत आवश्यकता असते. सर्वसाधारण माणसाने दिवसांतून साधारणतः ८ ग्लास पाणी पिणे जरुरीचे असते. पाण्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

परंतु एका अभ्यासानुसार पाणी नेहमी बसून प्यायला पाहिजे. कारण उभे राहून पाणी प्यायल्यास हृदय तसेच किडनीसंबंधित आजार बळाऊ शकतात असा अहवाल पुढे आला आहे.

खूप थंड पाणी पिणे तसेच एका श्वासात पाणी पिणे आरोग्यास चांगले नसते. सामान्य तापमानाचे पाणी घोटाघोटाने प्यायले पाहिजे. यामुळे शरीराचा रिदम बिघडत नाही आणि पाणी पिण्याचा फायदा शरारीताल प्रत्येक नसांपर्यंत पोहोचतो.

परंतु उभे राहून पाणी प्यायल्यास शरीराचा लिक्विड बॅलन्स बिघडतो. यामुळे शरीराच्या सांध्यांना पाणी मिळत नाही. यामुळे सांधेदुखीसारख्या समस्या सतावतात.

उभे राहून पाणी पिणे किडनीसाठी हानिकारक मानले जाते. यामुळे किडनीचा त्रास संभवतो. हृदयाच्या आरोग्यासाठी असे पाणी पिणे हानिकारक असते.

उभे राहून पाणी प्यायल्यास अन्न पचण्यास अडथळा येतो. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात होते ज्यामुळे हार्ट अॅटॅकसारख्या समस्या येऊ शकतात.

अशा पद्धतीने पाणी पिल्यास अल्सरची समस्या उद्भवू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या निर्माण होते. खाल्लेले अन्न नीट पचत नाही. यामुळे अपचानाचा त्रास होतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24