Personality Test : आपण आपल्या दैनंदिन जीवनात हजारो लोकांना भेटतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. बऱ्याचदा आपण व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या बोलण्यावरून किंवा वागण्यावरून लावतो. परंतु अनेकदा बोलण्यावरून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल कळून येत नाही, अशा वेळी आपण शरीराच्या अवयवांची मदत घेऊ शकतो. होय, आपण व्यक्तीच्या अवयवांवरून देखील तिच्याबद्दल जाणून घेऊ शकतो.
व्यक्तीचे चालणे, बोलणे, खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते आपल्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतात ज्याला “व्यक्तिमत्व विज्ञान” म्हणतात.
तुम्ही कसे उभे आहात हे देखील तुमच्या व्यक्तिमहत्वाची माहिती देते. आजच्या या लेखात आपण व्यक्तीच्या उभे राहण्याच्या पद्धतीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे जाणून घेणार आहोत, चला तर मग…
एक पाय बाहेर काढून उभे राहणे
उभं राहताना कधी-कधी आपण एक पाय बाहेर काढून उभे राहतो, असे उभे राहण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेले आहात. तुम्ही घाबरत नाही आणि जगाचा सामना करण्यास तयार आहात. तुम्ही स्पष्ट आवक्ते आहात. तुमची मते मांडायला तुम्ही कमी पडत नाही.
असे उभे राहिल्याने तुम्ही ऑफिसमध्ये एक चांगला नेता म्हणून समोर येता, लोक तुमचा आदर करतात. मीटिंग किंवा प्रेझेंटेशन दरम्यान हे उभे राहणे फायदेशीर आहे कारण ते तुमचा आत्मविश्वास दर्शवते. अशा प्रकारे उभे राहण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही जोखीम घेता आणि तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर विश्वास ठेवता. या पद्धतीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो.
एक पाय पुढे करून उभे राहणे
याचा अर्थ असा की तुम्ही सक्रिय आणि नेहमी पुढे जाणारे व्यक्ती आहात. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि करायला नेहमी तयार. तुमच्यात काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि ध्यास आहे. तुम्ही आयुष्य एखाद्या साहसासारखे जगता. ऑफिसमध्ये असे उभे राहणे हे दर्शवते की तुम्हाला बदल आणि प्रगती आवडते. नवीन कल्पना आणण्यात तुम्ही पुढे आहात. तुमचे सहकारी तुम्हाला एक अग्रगण्य व्यक्ती मानतात जो नेहमी प्रगतीच्या मार्गावर असतो.
नातेसंबंधांमध्ये, हे नवीन अनुभव स्वीकारण्याचा तुमचा स्वभाव दर्शवते. तुम्ही गोष्टी रोमांचक बनवता. पण नेहमी पुढे राहण्याच्या नादात तुमचा जोडीदार मागे राहू नये हे लक्षात ठेवा. नात्यात थोडा समतोल निर्माण करणंही गरजेचं आहे. आपले पाय पुढे ठेवून उभे राहणे हे देखील दर्शविते की जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण संधी ओळखण्यास त्वरित आहात. तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगल्या संधी सापडतील. पण हे विसरू नका की जे काही चमकते ते सोने नसते. पैसे मिळविण्यासाठी, जोखीम घेणे आवश्यक आहे.
एकावर एक पाय करून उभे राहणे
उभे असताना आपण कधी-कधी एका पायाच्या पुढे एक पाय करून थांबतो, आपण त्याला क्रॉस लेग देखील म्हणू शकतो, तुमची ही सवय तुमच्याबद्दल सांगते की तुम्ही सावध, गंभीर आणि शांत व्यक्ती आहात. असे लोक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही नीट विचार करत नाहीत. घाईघाईने कामे करतात ज्यामुळे पुढे जाऊन अनेक समस्यांचा समाना करावा लागतो, अशा लोकांना विचारपूर्णक निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो.
हे लोक भावनिक असतात. ऑफिसमध्ये अशा पद्धतीने उभे राहणे हे दर्शवते की आपण एक मेहनती आणि सावध व्यक्ती आहात. कोणतेही काम करण्यापूर्वी ते नीट समजून घेता. हे तुम्ही एक विश्वासार्ह कर्मचारी असल्याचे सिद्ध करते. तथापि, काहीवेळा थोडीशी जोखीम घेणे आवश्यक आहे.
एक सामान पाय असणे
कधी कधी तुमच्या लक्षात आले असेल की उभे असताना अनेक लोक त्यांचे पाय एकमेकांना चिकटवतात म्हणजेच दोन्ही पाय समान ठेवतात. ही स्टँडिंग स्टाइल तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी सांगू शकते. उभे राहण्याची ही शैली अनेकदा शांत आणि अंतर्मुख व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानली जाते. असे लोक अनेकदा विचारात मग्न असतात आणि त्यांना गोंगाटापासून दूर राहणे आवडते.
हे लोक आपल्या जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. ते काम आणि वैयक्तिक जीवन या दोन्ही गोष्टींना महत्त्व देतात आणि दोघांमध्ये संतुलन राखण्यास सक्षम असतात. हे लोक प्रेमात गंभीर असतात आणि कोणत्याही नात्यात घाई करत नाहीत. त्यांना योग्य जोडीदार शोधण्यासाठी वेळ लागतो आणि एकदा संबंध प्रस्थापित झाल्यानंतर ते पूर्णपणे समर्पित होतात.