मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर, वेगवेगळ्या मायाजाल असणाऱ्या नगरीत अनेक लोक धडपडत असतात. कुणी पोट भरण्यासाठी तर कुणी आपली स्वप्न साकार करण्यासाठी. परंतु यात काही लोक सक्सेस होतात तर काही लोक आहे त्याच जागेवर राहतात.
आज आपण या ठिकाणी अशी एक सक्सेस स्टोरी पाहणार आहोत की त्या व्यक्तीने रस्त्यावर बॅग विकण्यास सुरवात केली, पाहता पाहता आपल्या कष्टाने ‘हाय स्पिरिट’ नावाची 250 कोटींची कंपनी उभी केली. या व्यक्तीचे नाव आहे तुषार जैन. चला याबद्दल जाणून घेऊयात –
मुंबईच्या रस्त्यांवरील संघर्ष :- तुषार जैन यांचे सुरुवातीचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्तिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालावा यासाठी तुषार यांनी आपल्या वडिलांसोबत मुंबईच्या रस्त्यांवर बॅग विकण्यासाठी सुरवात केली. परंतु हीच गोष्ट त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट घेऊन आली व त्यांनी मार्केटमधील बारकावे व व्यवसायात असणाऱ्या तत्कालीन कमतरता हेरल्या व त्यातूनच सुरु झाला एक नवा प्रवास.
सुरु केला बॅग क्षेत्रात नवीन प्रवास :- मार्केटमधील बारकावे व व्यवसायात असणाऱ्या तत्कालीन कमतरता हेरल्या व तुषार यांनी त्यानंतर बॅग निर्मितीचे युनिट सुरू केले. पाहता पाहता व्यवसाय वाढला. 2007 पर्यंत त्यांचे या युनिटची व्याप्ती खूप वाढली. 2004 मध्ये तर त्यांनी 25 कोटी रुपयांचा नफा घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या एका युनिटची व्याप्ती वाढवण्याचा विचार केला व बिझनेसच्या विस्तार वाढवला. यातूनच High Spirit ची निर्मिती झाली.
High Spirit :- तुषार जैन यांनी 2012 मध्ये हाय स्पिरिट्स कमर्शिअल व्हेंचर्सची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून नाही पाहिले. त्यांनी आता बॅगच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले. परंतु गुणवत्ता जरी वाढली तरी त्या बॅग सामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवणार नाहीत अर्थात त्या जास्त महाग असणारं नाहीत याचीही त्यांनी काळजी घेतली. त्यांनी विविध वयोगटानुसार व विभिन्न वर्गावर ब्रँड तयार केले उदा. हॅशटॅग ब्रँड हा नवीन वयाच्या लोकांसाठी तर TraWorld हा प्रवासी लोकांसाठी ब्रँड केला. अशा प्रकारे त्यांनी लोकांच्या गरजा ओळखून ब्रँड बाजारात आणले.
किती आहे या बिझनेचा विस्तार :- आज हा व्यवसाय खूप वाढला आहे. कधी काळी रस्त्यावर बॅग विकणाऱ्या एका मुलाच्या या कंपनीत 500 हून अधिक कामगार काम करत आहेत. 500 कर्मचारी पे रोलवर आहेत. त्यांच्या कंपनीची उत्पादने भारतातील मोठ्या शहरांपासून तर अगदी लहान गावांपर्यंत पोहोचले आहेत. अभिनेत्री सोनम कपूर ही त्यांची ब्रँड अँबेसिटर राहिली आहे. आज तुषार जैन यांची कंपनी दररोज 30 ते 35 हजार बॅगचे उत्पादन करते. त्यांनी नुकतीच 1.31 लाख स्क्वेयर फूट मोठी फॅक्टरी भिवंडी येथे सुरु केली. आता त्यांचे टार्गेट 1 हजार कोटींच्या टर्नओहर करण्याचे आहे.