Sun Transit In Leo : कुंडलीत ग्रहांचे स्थान खूप महत्वाचे आहे. यामध्ये सूर्य आणि शनि सर्वात महत्वाचे ग्रह मानले जातात. वैदिक ज्योतिषात, सूर्य देव ग्रहांचा राजा मानला जातो आणि शनीला न्याय देवता म्हंटले जाते. अलीकडेच, सूर्य देवाने सिंह राशीत प्रवेश केला आहे, जिथे तो 17 सप्टेंबर पर्यंत विराजमान राहील, अशा स्थितीत बुधादित्य आणि संसप्तक राजयोग देखील तयार होईल, ज्यामुळे 4 राशींना फायदा होणार आहे, कोणत्या आहे या राशी चला पाहूया.
तूळ
सूर्य देवाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू ठरू शकते. कारण सूर्यदेव तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या घरात भ्रमण करत आहेत. त्यामुळे 17 सप्टेंबरपर्यंत तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. यासह, आपण उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांमधून पैसे कमविण्यात यशस्वी होऊ शकता. त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात उत्तम संधी मिळू शकतात. तसेच, जर तुम्ही कुठेतरी जुनी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यात नफा मिळण्याची शक्यता आहे.
धनु
सूर्य देवाचा सिंह राशीत प्रवेश शुभ मानला जात आहे. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्ही प्रवासाला जाऊ शकता. तसेच भाग्यवान होण्याची दाट शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील, यावेळी चांगले यश मिळू शकते. या काळात तुमचे मन धर्माच्या कार्यात गुंतले जाईल, जे भविष्यात लाभदायक ठरेल.
वृश्चिक
सूर्याचे भ्रमण लाभदायक असेल. संसप्तक राजयोगाचा लाभही तुम्हाला मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. बुधादित्य राजयोगात व्यवसायात लाभ, नोकरीत पदोन्नती आणि वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा काम बिघडू शकते. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी काळ उत्तम राहील. कामाचा ताण कायम असला तरी कामात यश मिळेल.
कर्क
सूर्यदेवाच्या हालचालीतील बदल फलदायी ठरू शकतो. 17 सप्टेंबरपर्यंत तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पैशाची बचत करण्यात यश मिळेल, उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. कौटुंबिक तणाव दूर होईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ योग्य आहे, ते उच्च संस्थेत प्रवेश देखील घेऊ शकतात. मीडिया, कम्युनिकेशन आणि मार्केटिंगशी संबंधित लोकांसाठी वेळ उत्तम असेल.