Sun Transit in Scorpio : 16 डिसेंबरपर्यंत ‘या’ राशींवर असेल सूर्याची कृपा; मिळतील अनेक लाभ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sun Transit in Scorpio : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना खूप महत्व आहे. नऊ ग्रहांपैकी सूर्याची भूमिका खूप महत्वाची मानली जाते. सूर्य हा ऊर्जा, आत्मा आणि पिता यांचा कारक मानला जातो. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खूप खोलवर परिणाम दिसून येतो. म्हणून सूर्याची भूमिका खूप महत्वाची मानली जाते.

अशातच 17 नोव्हेंबर रोजी, सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे, जे 4 राशींसाठी खूप फलदायी सिद्ध होणार आहे, मंगळ आधीच वृश्चिक राशीमध्ये असल्यामुळे मंगळ आणि सूर्याचा संयोग होईल जो काही राशींना विशेष परिणाम देईल. यानंतर 16 डिसेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करेल.

4 राशींसाठी 16 डिसेंबरपर्यंत सुवर्ण काळ !

वृश्चिक

वृश्चिक राशीत सूर्य देवाचे संक्रमण खूप शुभ मानले आजच्या आहे. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि करिअरमध्ये यश मिळेल. तसेच नशीब देखील तुमच्या बाजूने असेल, या काळात व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. तसेच नोकरदार लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. नवीन वस्तू खरेदी कराल. भागीदारी व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ लाभदायक मानली जात आहे. उपजीविकेची साधने वाढतील. व्यावसायिकांसाठी, तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकेल.

कर्क

सूर्यदेवाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात लहान मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात यश मिळू शकते. गुंतवणुकीतून नफा मिळेल. तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता म्हणजेच तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. विवाहित लोकांना मुले होऊ शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो. १६ डिसेंबरपर्यंत नशीब तुमच्या बाजूने राहील आणि सूर्याची विशेष कृपा राहील.

सिंह

सूर्याचे राशी संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. वाहन आणि मालमत्ता खरेदीचा योग आहे. या काळात जुन्या मालमत्तेच्या माध्यमातून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी काळ उत्तम असेल, या काळात बढती आणि वेतनवाढीचा लाभ मिळू शकतो. मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे जमीन, मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच बेरोजगारांना यावेळी नोकरीच्या संधी मिळू शकतात. त्यांना व्यवसाय आणि करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. 16 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जमीन, इमारत आणि वाहनाचा लाभ मिळू शकेल.

तूळ

सूर्याचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जात. या काळात त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. व्यवसायात मोठा नफा मिळेल. परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. तुमच्या कामात यश मिळेल. एखादी मोठी डील निश्चित होऊ शकते, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर मॉडेलिंग, कला, संगीत, मीडिया आणि फिल्म लाईनशी निगडित लोकांसाठीही वेळ उत्तम राहील. कर्जातून मुक्ती मिळाल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील.आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित पैसे मिळतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रमोशनही मिळू शकते.