लाईफस्टाईल

Sun Transits in Capricon Side Effects : नवीन वर्षात ‘या’ 4 राशींना सावध राहण्याची गरज; होऊ शकते नुकसान…

Published by
Ahmednagarlive24 Office

Sun Transits in Capricon Side Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाला विशेष महत्व आहे. सूर्य हा पिता, आत्मा, पद, प्रतिष्ठा आणि आदर यांचा कारक मानला जातो. सूर्य जेव्हा आपली बदलतो तेव्हा त्याचा परिणाम इतर सर्व राशींवर होतो. सूर्यदेव दार 1 महिन्यानंतर आपली राशी बदलतो. अशातच सूर्य नवीन वर्षात सूर्य १२ वेळा भ्रमण करेल. ज्याचा सर्वांवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येईल.

पहिले संक्रमण 15 जानेवारी रोजी होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. या काळात काहींचे नशीब उघडेल तर काहींना तोटा होईल. 13 फेब्रुवारीला सूर्य पुन्हा आपली राशी बदलेल. पण काही लोकांनी महिनाभर सतर्क राहावे. कोणत्या त्या राशी ज्यांना सावध राहण्याची गरज आहे, पाहूया…

तूळ

तूळ राशीच्या लोकांवर सूर्याच्या संक्रमणाचा वाईट परिणाम होईल. या काळात मानसिक तणाव असू शकतो. कौटुंबिक शांतता बिघडू शकते. प्रवासात काळजी घ्या, धनहानी होऊ शकते. तुम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून वाईट बातमी मिळू शकते. संयम आणि विवेक ठेवा.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी मकर राशीतील सूर्याचे फारसे चांगले राहणार नाही. या काळात आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. औषधे आणि आगीपासून दूर राहण्याची गरज आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन आव्हाने उभी राहू शकतात. जवळच्या लोकांशी संबंध बिघडू शकतात.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्य संक्रमण अनुकूल राहणार नाही. वैवाहिक जीवन खराब होऊ शकते. वैवाहिक जीवनात अडथळे येतील. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी सावध राहा.

धनु

धनु राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान होऊ शकते. आरोग्याबाबत सावध राहा. डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा कामे बिघडू शकतात.

Ahmednagarlive24 Office