Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्याला ग्रहांचा राजा म्हंटले जाते. अशातच सूर्याच्या संक्रमणाला देखील विशेष महत्व आहे. सूर्यदेव दर महिन्याला राशी बदलतात. ज्याचा परिणाम पृथ्वीसह राशींवर देखील दिसून येतो. सूर्य संपत्ती, आदर, आत्मा, ऊर्जा, मुले आणि यशासाठी जबाबदार आहे.
सध्या सूर्य मकर राशीत आहे. आणि १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. सूर्याचे हे संक्रमण 12 राशींवर परिणाम करेल. तसेच या काळात काही राशींना चांगले फळ देईल. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी चला पाहूया…
धनु
धनु राशीच्या लोकांना या काळात काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत आखले जातील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहील.
कन्या
कुंभ राशीतील सूर्याचे संक्रमण देखील कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. पदोन्नतीची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप काही घेऊन येणारा काळ असेल.
मेष
सूर्याच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना शुभ राहील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. उत्पन्न वाढेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. तुम्हाला मित्र आणि वडील यांचे सहकार्य मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनाही सूर्याच्या राशीत बदलाचा फायदा होईल. तुमचे व्यक्तिमहत्व एक चांगला नेता म्हणून उदयास येईल. मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायात लाभ होईल. नवीन घर आणि जमीन खरेदीची शक्यता आहे.