Surya Gochar : 17 सप्टेंबरपासून ‘या’ राशीच्या लोकांवर होणार धनवर्षा; बघा काय होतील बदल?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Surya Gochar : ग्रहांचा राजा सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा संक्रमण करणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार, सूर्य 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.11 वाजता सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे, ग्रह जेव्हा राशी बदलतात तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. अशास्थितीत सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप शुभ मानले जात आहे. नुकतेच सूर्याने 31 ऑगस्ट रोजी रात्री 9.44 वाजता पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे, जो 14 सप्टेंबर रोजी पहाटे 3.38 पर्यंत राहील. यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल, जे मेष, वृश्चिक, तूळ, धनु आणि सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ राहील.

या 6 राशींवर असेल सूर्याची कृपा

कन्या

ग्रहांचा राजा सूर्य देवाचे कन्या राशीतील संक्रमण खूप शुभ मानले जात आहे. हा काळ अविवाहितांसाठी चांगला राहील. याकाळात त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात, कुठेतरी संबंध प्रस्थापित होऊ शकतात. विवाहित लोकांच्या जीवनातही आनंद राहील. तसेच बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. स्थानिकांना समाजात मान-सन्मान मिळेल. जर तुम्ही परदेशी व्यावसायिकासोबत व्यवसायाची योजना आखत असाल तर तुम्हाला त्यात फायदा होईल.

वृश्चिक

कन्या राशीतील सूर्याचे संक्रमण प्रगती घडवून आणणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ शुभ राहील. तसेच नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामात यश मिळेल. सरकारी व्यवहार किंवा व्यावसायिकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. सूर्य राशीत बदल झाल्यामुळे लोकांचे व्यावसायिक जीवन चांगले राहील . या काळात अनेक उत्तम संधी मिळू शकतात. सरकारी कामात यश मिळेल. यासोबतच तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते.

धनु

सूर्याचे संक्रमण भाग्यकारक ठरणार आहे. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे करिअर आणि नोकरीमध्ये भरपूर बदल होऊ शकतात. ही वेळही चांगली मानली जात आहे. नवे घर आणि नवीन वाहन घेण्याची योजना आखू शकता. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सूर्याचा प्रवेश झाल्याने, बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. लांबचा प्रवास होण्याची दाट शक्यता आहे. त्यातून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.

सिंह

सूर्याचा कन्या राशीत प्रवेश लाभदायक ठरू शकतो. अचानक धलाभाची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थितीत बरीचशी सुधारणा होईल. करिअरसाठी काळ उत्तम आहे. कामात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सूर्य प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.

मीन

सूर्य देवाच्या राशी बदलामुळे कामात यश मिळेल. विवाहित आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील. व्यावसायिकांना भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवल्यास फायदा मिळू शकतो. ज्योतिष, संशोधन, अध्यात्म, कथा सांगणारे आणि धार्मिक कार्याशी संबंधित लोकांना खूप फायदा होईल. तसेच अचानक पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे.

मेष

सूर्याचा राशी बदल या लोकांसाठी शुभ मनला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात यशाचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील, ते काही स्पर्धेत उत्तीर्ण होऊ शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच तुमच्या मेहनतीचे तुम्हाला योग्य ते फळ मिळेल.