Surya Rahu Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे, नऊ ग्रहांमध्ये सूर्य आणि राहु यांना विशेष महत्व आहे. जेव्हा-जेव्हा या ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल होतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनासह पृथ्वीवरही खोलवर होतो.
तसेच या ग्रहांचा सांयोग मानवी जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आणतात. काहींसाठी यांचा संयोग शुभ असतो तर काहींसाठी यांचा संयोग अशुभ मानला जातो.
दरम्यान, सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे लोकांच्या कुंडलीत यशाची शक्यता निर्माण होत आहे. या काळात बुद्धिमत्ता, उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे. राजकारण आणि तांत्रिक कौशल्याशी संबंधित लोकांना फायदा होणार आहे. सध्या राहू मीन राशीत आहे आणि 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. 15 मार्च रोजी दोन्ही ग्रहांचा संयोग होईल. जो काही राशींसाठी खूप लाभदायक ठरेल.
वृषभ
सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या काळात आध्यात्मिक लाभ होईल. इच्छा पूर्ण होतील. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. एकूणच यांचा संयोग खूप काही घेऊन येणारा असेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी ग्रहांची ही जोडी खूप उत्तम राहील. या काळात करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. परदेशात जाण्याचे बेत आखले जातील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होतील. शत्रूंवर विजय मिळवाल. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूच्या संयोगाने यशाचे दरवाजे उघडतील. कुटुंबात शांती आणि समृद्धी राहील. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्य आणि आध्यात्मिक कार्यातून लाभ होईल.