Surya Rashi Parivartan 2023: एका निश्चित वेळेच्या अंतराने ग्रह संक्रमण करत राशी बदलतात यामुळे याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येते अशी माहिती वैदिक ज्योतिषशास्त्रात देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हा परिणाम काही लोकांसाठी शुभ तर काही लोकांसाठी अशुभ असतो .
यातच आता 15 मार्च रोजी मीन राशीत सूर्यदेवाचा प्रवेश झाला आहे. यामुळे याचा देखील परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो तीन राशी असे आहे ज्यांना काळजी घ्यावी लागणार आहे नाहीतर त्यांचा मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे. चला मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
सूर्य ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून सातव्या भावात प्रवेश करत आहे. त्यामुळे या काळात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. भांडणे आणि वादविवादांना सामोरे जावे लागू शकते. तसेच नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे वाद टाळा. सध्या नवीन काम सुरू करू नका. तसेच पैसे गुंतवणे टाळा. आईसोबतचे संबंधही बिघडू शकतात.
सूर्याचा राशी बदल मकर राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकतो. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात झाले आहे. म्हणूनच यावेळी तुमची तुमच्या भावंडांसोबत वैर असू शकते. यासोबतच आर्थिक नुकसान किंवा संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नवीन गुंतवणूक करणे टाळा. त्याच वेळी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचे काही डील रखडतील.
सूर्य देवाचा राशी बदल मेष राशीच्या लोकांसाठी थोडा हानिकारक ठरू शकतो. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून 12व्या भावात प्रवेश करत आहे. त्यामुळे यावेळी काही फालतू खर्च होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
त्याचबरोबर वैद्यकीय उपचारांवर पैसे खर्च करावे लागतील. या काळात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच जोडीदारासोबत काही विषयावर मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी, कारण अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
हे पण वाचा :- Lava Yuva 2 Pro : विश्वास बसेना ! ‘हा’ स्टायलिश फोन मिळत आहे 500 पेक्षा कमी किमतीमध्ये ; जाणून घ्या कसं