Surya Shani Gochar : मे महिना संपण्यास अवघे काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असे असताना येणाऱ्या जून महिन्यामध्ये सूर्य आणि शनि एकाच वेळी भ्रमण करताना दिसणार आहे. दरम्यान ज्योतिष शास्त्राच्या मतानुसार, सूर्य आणि शनि यांचे एकाचवेळी वक्री चाल चालणार आहे.
ही चाल खूप महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आगामी जून हा महिना काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे तर काही राशींच्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरणार आहे. जाणून घेऊयात सूर्य आणि शनि यांच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, सूर्य आगामी 15 जून रोजी संध्याकाळी 06.07 वाजता मिथुन राशीत तसेच नंतर 16 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 17 जून रोजी रात्री 10.48 वाजता शनी कुंभ राशीत मागे जाणार असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे शनि आणि सूर्य एकत्र भ्रमण करताना दिसणार आहे. ज्याचा प्रभाव काही राशींवर चांगला तर काही राशींवर वाईट दिसून येणार आहे. दरम्यान सूर्य आणि शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींवर कसा परिणाम दिसून येईल जाणून घेऊया.
1. मिथुन
दरम्यान आता सूर्य आणि शनीच्या संक्रमणामुळे मिथुन रास असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळणार आहे. इतकेच नाही तर त्यांना सरकारी क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळू शकते. तसेच तुम्ही तुमच्या खर्चावरही नियंत्रण ठेवू शकता, त्यामुळे तुमच्या जीवनात सुसंवाद येऊ शकतो.
व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात चांगला नफा आणि प्रगती मिळू शकते. या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ प्राप्त होईल. अशातच ज्या लोकांना नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार केला होता, त्यांची इच्छा पूर्ण होईल. त्यांना कौटुंबिक जीवनाचाही आनंद घेता येईल. या दरम्यान तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
2. सिंह
सिंह रास असणाऱ्या लोकांना सूर्य आणि शनीच्या संक्रमणामुळे भाग्याची साथ मिळू शकते. त्यांच्या कुटुंबात शांतता नांदेल. तसेच तुम्हाला प्रॉपर्टीच्या माध्यमातून चांगले पैसे कमवता येतील. याचा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यांचे आरोग्य सुधारेल आणि धार्मिक कार्यात सहभाग लाभदायक ठरू शकतो. या दरम्यान तुमची प्रतिमा सामाजिकदृष्ट्याही मजबूत होईल.
3. कन्या
कन्या रास असणाऱ्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचे संक्रमण चांगले राहणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगला काळ पाहायला मिळेल. तसेच आर्थिकदृष्ट्या तुमची स्थिती मजबूत असणार आहे. या काळात तुम्ही यशाकडे वाटचाल करत असाल. विद्यार्थ्यांना यश तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. येत्या काळात तुमच्या खर्चात वाढ होईल, परंतु काळजी करण्याचे कारण नाही. जरी खर्च होत असला तरी या खर्चामुळे तुमचे कोणतेही काम थांबले जाणार नाही.
4. मकर
मकर रास असणाऱ्या लोकांना या मार्गक्रमणात आर्थिक लाभ होईल. तुमचे काम आणि करिअर आघाडीवर राहून तुम्हाला काही फायदे होतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या वडिलांचा किंवा वडिलांसारख्या लोकांचा तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. इतकेच नाही तर तुम्हाला तुमच्या भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या दरम्यान, तुम्ही तुमच्या जीवनातील इतर क्षेत्रांमध्येही खूप रस घेऊ शकता. तसेच तुमचा उत्पन्नाचा प्रवाह चांगला असेल. परंतु तुम्हाला आगामी काळात खर्च आणि बचत यांची काळजी घ्यावी लागणार आहे.