Meen Sankranti 2024 : गुरुवार, म्हणजेच आज 14 मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. आजचा हा दिवस मीन संक्रांती म्हणून ओळखला जातो. सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. कारण जेव्हा सूर्य गुरूच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होते. गुरुवारपासून खरमास सुरू झाल्याने महिनाभर शुभ कार्यांवर बंदी येणार आहे.
मीन संक्रांतीचा दिवस भगवान विष्णू आणि सूर्य देवाला समर्पित आहे. या दिवशी तर्पण अर्पण करणे आणि स्नान करणे शुभ मानले जाते. मीन संक्रांतीचा शुभ काळ दुपारी 12:46 ते संध्याकाळी 6:29 पर्यंत असेल. महा पुण्यकाल दुपारी १२:४६ ते २:४६ पर्यंत चालेल. मीन संक्रांतीचा मुहूर्त 14 मार्च 2024 रोजी दुपारी 12:46 वाजता आहे. जर तुम्ही आजच्या या दिवशी काही उपाय केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते असे म्हंटले जाते. कोणते आहेत ते उपाय पाहूया..
मीन संक्रांतीच्या दिवशी काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते. हे उपाय केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. तसेच जीवनात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच भगवान विष्णू आणि सूर्य देवाचा विशेष आशीर्वाद देखील मिळतो.
आजच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करा. सूर्यस्तोत्राचा पाठ करा. असे केल्याने आरोग्याशी संबंधित सर्व दूर होतात. तसेच तुमचा आदर वाढेल, यश मिळण्याची शक्यता आहे.
मीन संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. गरजू आणि गरिबांना अन्न, कपडे, तेल, बूट, भांडी इत्यादी दान करा. असे केल्याने ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. आणि आर्थिक बाजू मजबूत होते.
आजच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करा. असे केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. कुटुंबात सुख-शांती नांदते. संपत्ती आणि समृद्धी देखील वाढते.