लाईफस्टाईल

श्रीमंत बनण्याचा मार्ग सांगणारा रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक स्वतः बनले कर्जबाजारी ! त्यांच्यासोबत असं काय विपरीत घडलं ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Rich Dad Poor Dad Writer In Debt : तुम्ही रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक एकदा तरी नक्कीच वाचल असेल किंवा या पुस्तकाविषयी किमान ऐकलं तरी असेल. या पुस्तकाची लोकप्रियता एवढी अधिक आहे की आत्तापर्यंत जगातील दोनशे पैकी किमान एक माणसाने तरी हे पुस्तक वाचलेले आहे. या पुस्तकात लेखकाने श्रीमंत होण्याचा मार्ग सांगितला आहे. श्रीमंत होण्यासाठी त्याने काही महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत. यात त्याने गुंतवणूक कुठे केली पाहिजे, पैशाला पैसा लावून कसे श्रीमंत होता येते? याबाबत त्यांनी या पुस्तकात माहिती दिली आहे.

आपण पैसे कमावण्यासाठी काम करण्याऐवजी पैशाने आपल्यासाठी काम केले पाहिजे तसेच श्रीमंत आणि गरीब व्यक्तींमधील विचारसरणीचा त्यांनी या पुस्तकात उहापोह केलेला आहे. विशेष म्हणजे हा उहापोह लोकांना विशेष आवडतो. हेच कारण आहे की हे पुस्तक अनेकांनी वाचले आहे. हे जगातील एक बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. हे पुस्तक जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे.

मात्र या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी हे सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दाबले गेले आहेत. दुसऱ्यांना श्रीमंत बनवण्याचा मार्ग सांगणारा सध्या स्वतः कर्जबाजारी झाला असल्याने सध्या या लेखकाबाबत सोशल मीडियामध्ये मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. अनेक प्रसार माध्यमांनी देखील याबाबतचे वृत्त प्रकाशित केलेले आहे. विशेष म्हणजे ते कर्जबाजारी आहेत याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी instagram वर एक रील शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्यावर एक लाख अब्ज डॉलर पेक्षा अधिक कर्ज असल्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर तब्बल 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 9982 कोटी रुपये एवढे कर्ज आहे. यामुळे दिव्याखाली अंधार असतो ही म्हण त्यांच्याबाबत तरी शंभर टक्के खरी ठरत आहे.

मात्र रॉबर्ट यांच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज असतानाही त्यांना या कर्जाची भीती नाही तसेच या कर्जाची चिंता देखील नाही. त्यांनी इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी माझं कर्ज १ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलंय. परंतु, मी दिवाळखोर झालो तर बँकही दिवाळखोर होईल. त्यामुळे मला फार काही अडचण नाही. त्याचबरोबर मला या कर्जाची चिंतादेखील नाही असे म्हटले आहे.

या व्हिडिओत रॉबर्ट म्हणतात की बहुसंख्य लोक कर्ज घेऊन त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढवत आहेत. म्हणजेच त्यांनी कर्ज घेऊन त्यांची संपत्ती वाढवलेली असते. मात्र फेरारी आणि रोल्स रॉयल्स यांसारख्या गाड्या तुमची संपत्ती नसून ती तुमची जबाबदारी आहे. पण रॉबर्ट यांच्याकडे तब्बल 100 मिलियन डॉलरची संपत्ती आहे. ते सांगतात की ते पैसे कधीही साठवून ठेवत नाहीत.

ते त्यांच्याकडील पैसे नेहमीच गुंतवतात. त्यांनी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. व्हिडिओत त्यांनी मी कर्जाला कधीही घाबरत नाही कारण की कर्ज म्हणजेच पैसे, असं त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी लोकांना कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे. ते सांगतात की लोकांनी कर्ज घ्यावे आणि रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करावी.

Ahmednagarlive24 Office