आजारांवर सर्वोत्तम घरगुती उपाय! बहुगुणी कडुनिंबाचे 10 फायदे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- आपल्या शरीरातील आतल्या व्याधींपासून ते त्वचेच्या बाबत असणाऱ्या आजारावर कडुनिंब हे फायद्याचे आहे.

आपण असे म्हणू शकतो की देवाने व निसर्गाने कडुलिंब हे माणसांना निरोगी राहण्यासाठी च बनवले आहे की काय. दररोज कडुनिंबाच्या दोन कोवळ्या पानांचे सेवन केले तर आपले आरोग्य उत्तम राहिलं. तसेच याशिवाय आपल्याला कोणताही आजार होणार नाही.

कडुनिंबाचे हे आहेत फायदे

1. आपण बाहेरील काही सटर फटर खात असतो त्यामुळे बऱ्याचवेळा आपल्या पोटात जंत निर्माण होतात किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन हे होत असतं. परंतु अशा वेळी कडुलिंबाची पाने खूप फायद्याचे ठरतात. कडुलिंबाच्या पानाचा रस करून त्यामध्ये थोडेसा मध व काळी मिरीची पावडर घालून ते घेतल्यास पोटाचे सर्व आजार बरे होतात.

2. तुम्हाला जर त्वचेचे आजार, संसर्गजन्य रोग असेल तर गरम पाण्यामध्ये कडुनिंबाची पान उकळावीत आणि त्या पाण्यानं अंघोळ करावी. कडुनिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.

3. कडुनिंबाचे पानांचा उपयोग शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडुनिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.

4. आपल्या दातांसाठी कडुलिंब खूप फायदेशीर आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात.

5. तुम्हाला जर पित्ताशयाच्या बाबतीतला आजार असेल तर कडुलिंबाचा रस उपायकारक आहे. या सगळ्या आजारावर फक्त या एकट्या कडुलिबांच्या रसापासून मुक्तता मिळते.

6. कडुलिंबात अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे आपण जर कडुलिंबाची सालं, पान व फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्याला लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते.

7. या व्यतिरिक्त घरामध्ये ठेवलं जाणारं धन्य अथवा कडधान्यांचं किडे, उंदीर घुशीपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे किडे, मुग्या आणि उंदराचा त्रास होणार नाही. धान्यही सुरक्षित राहिल.

8. कान दुखत असेल किव्हा कानामधून पाणी येत असेल तर कानामध्ये कडुलिंबाचे तेल टाकले तर काना बाबतचे सर्व आजार बरे होतात.

9. कफ, खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडुनिंबाचा वापर होतो. श्वसन विकारांवर कडुनिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतं.

10. डोकेदुखी, दातदुखी, हातापायांना होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापर केला जातो.

अहमदनगर लाईव्ह 24