Ketu Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात केतूला विशेष महत्व दिले जाते. केतू हा मोक्ष, कल्पनाशक्ती, त्याग, ज्ञान, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, मानसिक गुण, कल्पनाशक्ती, अध्यात्म, तांत्रिक इत्यादींचा कारक मानला जातो. तसेच केतू हा मीन राशीचा स्वामी ग्रह आहे. हा मायावी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी खूप वेळ लावतो. हा संत गतीने चालणार ग्रह आहे.
सध्या केतू कन्या राशीत आहे. आणि पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये सिंह राशीत संक्रमण करेल. या काळात काही राशींना खूप लाभ मिळेल. असे म्हणतात ज्यांच्या कुंडलीत केतू बलवान असतो, त्यांच्यावर श्रीगणेशाची विशेष कृपा राहते, आणि सर्वकाही मनासारखे घडते. राहूच्या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल पाहूया…
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी केतूचे संक्रमण खूप शुभ मानले जात आहे. या काळात प्रगतीची दाट शक्यता आहे. भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. पैशाशी संबंधित समस्या संपतील. प्रवासाची शक्यता आहे. पण या काळात आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांवर केतू विशेष कृपा करणार आहे. या काळात यशाची शक्यता असेल. व्यवसायात फायदा होईल, तसेच तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा.
मेष
मेष राशीच्या लोकांवरही केतू दयाळू असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीत फायदा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.