Numerology : ज्योतिषशास्त्र पूर्णपणे 12 राशी आणि नऊ ग्रहांवर कार्य करते. भविष्यात घडणाऱ्या घटना किंवा वर्तमानात चालू असलेल्या गोष्टी याबद्दल आपल्याला राशीत उपस्थित असलेल्या ग्रहांनुसार माहिती मिळते. ज्योतिषशास्त्र एक नव्हे तर अनेक शाखांमध्ये विभागले गेले आहे, त्यापैकी एक अंकशास्त्र आहे. ज्योतिष शास्त्रात अंकांना खूप महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य जाणून घेता येते तसेच अंक शास्त्रात अंकांच्या मदतीने व्यक्तीबद्दल बरेच काही समजते.
अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून एक संख्या शोधली जाते तिला मूलांक संख्या असे म्हणतात, ही मूलांक संख्या जन्मतारखेची बेरीज करून काढली जाते. अंकशास्त्रात याच मूलांक संख्येच्या आधारे व्यक्तीबद्दल सर्वकाही जाणून घेता येते. आज अशा काही मूलांक संख्येबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी हा मे महिना खूप चांगला जाणार आहे.
मूलांक 1
या व्यक्तींचा जन्म 1, 10, 19 आणि 28 या तारखेला होतो. त्यांची मूलांक संख्या 1 असते. या महिन्यात या लोकांची सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्यांच्या जीवनात रोमांचक बदल घडतील. तुम्ही तुमचे जीवन सुखसोयींनी व्यतीत कराल आणि तुमची संपत्ती वाढेल. तुम्ही तुमचे बोलणे गोड ठेवाल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला प्रियजनांचे सहकार्य मिळेल आणि आनंदी वातावरण असेल.
मूलांक 3
ज्या लोकांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 या तारखेला होता त्यांची मूलांक संख्या 3 असते. या लोकंना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळणार आहे. तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश अपेक्षित आहे. वैयक्तिक व्यावसायिक जीवनातील वातावरण उत्तम राहील. जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळेल. लक्षात ठेवा, प्रकरण काहीही असो, करिअर असो, पैसा असो किंवा प्रेम असो, निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागतो. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील ज्यामुळे पैशाची आवक वाढेल.
मूलांक 8
ज्या लोकांचा जन्म 8, 17, आणि 26 तारखेला होतो, त्यांची मूलांक संख्या 8 असते. या लोकांना हा महिना आर्थिक यश देणारा आहे. कुटुंब आणि मित्रांच्या सहकार्याने तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. अफाट यशाची शक्यता दिसत आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनमध्ये मूल्यांकन मिळू शकते. नेहमीप्रमाणे, सकारात्मक विचारसरणीने जीवनात पुढे जा. करिअरमध्ये प्रगती होईल. प्रेमसंबंध मधुर राहतील.