ब्रेकअप हा आयुष्यातला सर्वात कठीण काळ असतो. बऱ्याच जणांना यातून बाहेर येणं खूपच कठीण होऊन बसतं. यातून बाहेर येण्यासाठी बरीच वर्षही लागतात. आयुष्य काही कामाचं नाही आणि सगळं जग मतलबी असल्यासारखं वाटायला लागतं. पण यातून बाहेर येणं अत्यंत गरजेचं असतं पण यात अनेक अडथळेही असतात.
काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका संशोधनामुळे आजच्या पिढीला इन्स्टाग्राम , फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास सर्वाधिक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ब्रेकअप झाल्यानंतर सर्वात आधी लोक आपल्या एक्स जोडीदारास सोशल मीडियावरून रिमूव्ह , अनफ्रेंड , अनफॉलो करण्याचा प्रयत्न करतात . मात्र , अनफ्रेंड , अनफॉलो केलेल्या एक्सचा सोशल मीडियावर कधीना कधी सामना होतो , असं या संशोधनातून समोर आलं आहे.
आपल्या एक्सला सोशल मीडियाच्या अकाउंटवरून अनफ्रेंड, अनफॉलो केल्यास त्याचा भविष्यात आपल्याला कधीही सामना करावा लागणार नाही, असं अनेकांना वाटतं ; पण ठरावीक अंतरानंतर त्यांच्याशी निगडित अनेक लहान मोठ्या गोष्टींचा फीड आपल्याला इन्स्टाग्राम , फेसबुकवर दिसू लागतात.
यामुळे जुन्या आठवणी ताज्या होऊन अधिक मनस्तापा होतो, जितका वेळ आपण सोशल मिडीयावर असतो. तितका वेळ आपण ताण-तणावाखाली असतो. कारण जितका वेळ आपण आपल्या एक्सच्या सोशल मिडीयावरील अकाऊन्ट साठी देत असतो.
तितका वेळ आपण मानसीकदृष्ट्या तणावाखाली असतो. त्यामुळेच आपल्याला त्या नात्यांमधून बाहेर पडणं कठिण होतं. ब्रेकअपनंतर आपण एक्स सतत विचार आणिएक्सच्या सोशल मिडीयाकडे लक्ष ठेवून असल्यामुळे तुम्ही तुमच्या एक्सला विसरू शकतं नाही.
अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवत असतात. ज्या आपल्या मानसीक आरोग्यासाठी चांगल्या नसतात तुमच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे. तुम्ही काय विचार करत आहात, कोणाचा मूड कसा आहे, नुकतेच कोणाचे ब्रेकअप झाले हे व्हॉटसअपच्या स्टेटसवरून समजते.