अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- बिग बॉस 15 ची ट्रॉफी तेजस्वी प्रकाशने जिंकली आहे आणि त्यासोबतच 40 लाख रुपये देखील जिंकले आहेत. तर प्रतिक सहजपाल उपविजेता ठरला. बिग बॉसच्या घरातील तेजस्वीचा प्रवास एकदम धमाकेदार ठरला.
करण कुंद्रासोबतची तिची रोमॅन्टिक केमिस्ट्री चांगलीच गाजली. ‘बिग बॉस 15’च्या घरात तेजस्वी व करण कुंद्रा यांचा लव्ह केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती.
करण कुंद्रा, प्रतिक सहजपाल, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट या पाच फायनलिस्टमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली.
अखेरच्या क्षणाला निशांत भट्ट आणि शमिता शेट्टी हे दोघं बाद झालेत आणि प्रतिक सहजपाल, करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश असे टॉप 3 फिनाले रेसमध्ये उरलेत.
या तिघांमधून ‘बिग बॉस 15’चा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना करण कुंद्राही बाद झाला आणि तेजस्वी व प्रतिक असे टॉप 2 स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत उरले.
यापैकी कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सलमानने तेजस्वी प्रकाशच्या नावाची घोषणा केली. तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी सोपवण्यात आली.
‘बिग बॉस 15’ची ट्रॉफी उंचावताना तेजस्वीच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.‘बिग बॉस 15’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वीने चाहत्यांचे मनापासून आभार मानलेत.