अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- भारतीय बाजारपेठेत कम्युटर बाइक्सची सर्वाधिक विक्री होते. या बाईक्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्या किमतीत किफायतशीर आहे, तसेच मायलेजही उत्तम आहे. आज आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येणार्या अशा 5 बाईक सांगत आहोत,
Honda SP 125 या बाईकची किंमत 80,086 रुपये ते 84,087 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प आणि संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. यामध्ये स्पीड, ओडोमीटर, ट्रिप मीटर, ईसीओ इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर, फ्युअल इकोनॉमी यासारखी माहिती डिस्प्ले होते. बाईकमध्ये 124 cc इंजिन देण्यात आले आहे.
Hero Glamour या बाईकची सुरुवातीची किंमत 89,256 (एक्स-शोरूम) आहे. यात 124.7 cc इंजिन देण्यात आले आहे. ते 10.72bhp पॉवर आणि 10.6Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
यात एलईडी हेडलाइट, ब्लूटूथ-अनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टमयूएसबी चार्जर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Bajaj Pulsar 150 या बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 149.5 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14bhp पॉवर आणि 13Nm टॉर्क जनरेट करते.
जिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक neon, single disc आणि dual disc या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
Honda Unicorn या बाईकची किंमत 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 162.7 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 13bhp पॉवर आणि 14Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
तुमच्या सोयीसाठी, युनिकॉर्नमध्ये ट्यूबलेस टायर, अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टॉप स्विच, ABS सह फ्रंट डिस्क ब्रेक सारखे फीचर्स देण्यात आलेत.
Bajaj Pulsar NS125 बजाज पल्सर NS 125 ची किंमत 99,347 (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे. बाईकमध्ये 124.45 cc इंजिन देण्यात आले आहे,
हे इंजिन 12bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. यात नायट्रोक्स मोनो-शॉकसह टेलिस्कोपिक फोर्क्स उपलब्ध आहेत.