लाईफस्टाईल

Speed Limits On Car : इथे आल्यावर टेन्शन नाही ! ताशी १६० किलोमीटर जास्त वेगाने कार चालवू शकता

Published by
Ahmednagarlive24 Office

Speed Limits On Car : रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांसाठी जगभरातील सर्वच देशात वेगमर्यादा निश्चित केलेली असते. या वेगमर्यादेचे भान प्रत्येक वाहन चालकाला ठेवावेच लागते. अन्यथा दंड आकारला जातो.

नुकतीच वाहनांच्या वेगमर्यादेसंबंधी एक रंजक माहिती समोर आहे. त्यानुसार जगात असे काही देश आहेत की ज्या देशांत तुम्ही ताशी १६० किलोमीटर किंवा त्याहून जास्त वेगाने वाहन चालवू शकता. या यादीत जर्मनी हा देश जगात अव्वलस्थानी आहे.

जर्मनीतील अनेक रस्त्यांवर अगदी सुसाट वेगात वाहन चालवण्याची परवानगी आहे. या रस्त्यावर वाहनचालक वाटेल तेवढ्या वेगात वाहन चालवू शकतो. येथे काही महामार्गांचे असे भाग केले आहेत,

ज्यांवर वाहनांच्या वेगावर कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या यादीत जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे. जर्मनीनंतर यूएई दुसऱ्या क्रमांकावर आहे. युएईमध्ये १६० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहन चालवता येऊ शकते. मात्र, ही वेगमयार्दा ठराविक रस्त्यांवरच लागू आहे.

बल्गेरिया, कझाकिस्तान, पोलंड, सौदी अरब आणि तुर्की या देशांमध्ये वाहनांची कमाल वेग मर्यादा १४० किलोमीटर प्रतितास एवढी निश्चित करण्यात आली आहे,

तर महासत्ता अमेरिकेत वेगमर्यादा ताशी १३७ किलोमीटर आहे. रशिया, रोमानिया, सर्बिया आणि नेदरलँडस् या देशांमध्ये ही मर्यादा ताशी १३० किलोमीटर आहे. भारतात वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर आहे

दुसरीकडे असेही काही देश आहेत ज्या देशांमध्ये वेगमर्यादा तुलनेने कमी आहे. वाहनांवर सर्वात कमी वेगाची मर्यादा असलेल्या देशांमध्ये बांगलादेश, टांझानिया आणि मकाऊ या देशांचा समावेश होतो. येथे वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटरआहे.

Ahmednagarlive24 Office