लाईफस्टाईल

Best Laptop For student : जबरदस्त फीचर्ससह येतात ‘हे’ 5 लॅपटॉप, किमतीही अगदी बजेटमध्ये

Published by
Ahmednagarlive24 Office

Best Laptop For student : आजकाल प्रत्येकाच्या लाईफमध्ये लॅपटॉप महत्त्वाचा झाला आहे. तो विद्यार्थ्यांसाठी देखील आता महत्त्वाचा बनत चालला आहे. अभ्यासापासून मनोरंजनापर्यंत विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे.

आज आपण अशा 5 लॅपटॉप विषयी माहिती येथे पाहणार आहोत जे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात त्यांना खूप मदत करू शकतात. हे अतिशय चांगल्या बिल्ड क्वालिटीसह येतात. यात खूप दमदार फीचर्स आहेत.

1. RedmiBook Pro

हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला ठरू शकतो, कारण या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून या लॅपटॉपमध्ये 8GB रॅम आणि 512GB एसएसडी स्टोरेज आहे. आज लॅपटॉपमध्ये बॅटरी बॅकअपला अत्यंत महत्व आहे. हे अतिशय महत्वाचे मानले जाते.

या लॅपटॉपमध्ये 46Wh बॅटरी पॅक आहे, जे 65W चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्याची बॅटरी किमान 10 तास टिकू शकते. लॅपटॉपमध्ये Windows 11 चा सपोर्ट आहे. हा लॅपटॉप तुम्हाला 40 हजार रुपयांपर्यंत येतो.

2. Acer Extensa 15

जर तुम्हाला अभ्यासासोबत काही इतर वर्क करायचं असेल तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमध्ये 45 डब्ल्यूएच बॅटरी पॅक आहे, जो एकदा चार्ज केल्यावर 8 तासांपर्यंत बॅकअप घेऊ शकतो.

लॅपटॉपची किंमत 42,990 रुपये आहे. यात 8GB रॅम आणि 512GB एसएसडी स्टोरेज असून याचा प्रोसेसर i5 11th Gen चा आहे.

3. Lenovo Ideapad 3

जर तुम्हाला AMD प्रोसेसर असणारा लॅपटॉप हवा असेल तर हा चांगला पर्याय आहे. या लॅपटॉपमध्ये Backlit कीबोर्ड आहे, जो कोडिंग च्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला ठरू शकतो. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून Ideapad 3 मध्ये एएमडी Ryzen 5 5500U प्रोसेसर आहे.

याच्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर याचा बॅटरी बॅकअप 7 तासांचा आहे. या लॅपटॉपमध्ये 8 जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी स्टोरेज असून यात 45 डब्ल्यूएच बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 7 तास आरामात चालू शकते.

4. Infinix INBook X2 Plus

जर तुम्हाला Infinix चा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर Infinix InBook X2 Plus तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा एफएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची ब्राइटनेस 300 निट्स आहे. यात 50Wh ची बॅटरी देण्यात आली आहे,

ज्यात चार्जिंगसाठी 65W चार्जर देण्यात आला आहे. हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यावर 10 तासांचा बॅकअप देऊ शकतो. यात इंटेलचा i5 11th Gen चा प्रोसेसर आहे, विशेष म्हणजे या लॅपटॉपमध्ये FHD वेबकॅम आहे.

5. Honor MagicBook X14

जर तुम्हाला लहान आकाराचा लॅपटॉप हवा असेल तर हा लॅपटॉप भारी आहे. कारण या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे आणि 56 वॉट बॅटरी पॅक आहे, जो 65 वॉट चार्जरने चार्ज केला जाऊ शकतो. हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर 9 तासांचा बॅकअप देतो.

या लॅपटॉपमध्ये i5 11th Gen चा प्रोसेसर आणि बॅकलिट कीबोर्ड आहे. विशेष म्हणजे ते अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office