टरबूजाच्या सालीचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक गुणकारी फायदे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-टरबूज हे सर्वत्र उपलब्ध होणारे फळ आहे. उन्हाळ्यामध्ये याचे उत्पादन घेतले जाते. याला कलिंगड असेही म्हणतात. टरबूज हे आरोग्यास फायदेशीर असतेच परंतु त्याच्या सालीमधेही गुणकारी गुणधर्म असतात.

सालीवरील हिरवा भाग आणि लालसर गर यांच्यामधील पांढऱ्या भागातही पोषक घटक असतात. जाणून घेऊयात टरबूजाच्या सालीचे फायदे-

१)  हृदय निरोगी राहते –
कलिंगडाच्या सालीतील  पोषक घटक हृदय निरोगी ठेवण्यात मदत करतात. रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे हृदयाचे बहुतेक आजार, समस्या दूर राहतात.

२) किडनीचे आरोग्य उत्तम राहते –
या सालीत पोटॅशिअम असतात, ज्यामुळे किडनी निरोगी राहतो. हायड्रेटिंग गुण असतात ज्यामुळे यूटीआयसारख्या समस्या दूर राहतात.

३) चेहरा निरोगी ठेवते
कलिंगडाच्या सालीत लायकोपिन घटक असतो जो इन्फ्लेमेशन कमी करण्यात मदत करतो. शिवाय पिंपल्सही जास्त येत नाहीत. त्यामुळे चेहरा निरोगी राहतो.

४) रक्तदाब नियंत्रणात राहतो –
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही कलिंगडाची साल फायदेशीर आहे.

५) वजन नियंत्रित राहते
कलिंगडाच्या सालीवरील पांढऱ्या भागात फायबर भरपूर असतात, यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं, तुम्ही जास्त खात नाहीत परिणामी वजन नियंत्रणात राहतं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24