अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-आजकाल पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणजे मेल हार्मोनची कमतरता भासत आहे. वाया वाढीनुसार याची लेव्हल कमी होत जात असली तरी आता काही चुकांमुळे ऐन तारुण्यातही याचे प्रमाण कमी होत जाताना दिसत आहे.
टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे मधुमेह, हृदय विकार आणि थकवा जाणवतो तसेच सेक्सची इच्छाही कमी होते. तुमच्या शरीरातील स्पर्म काऊंट कमी होत असल्याचे तुम्ही सामान्यपणे रक्ताच्या चाचणीनेही करू शकतात.
पण तुम्ही तुमच्या काही सवयी सुधारल्या तर या अडचणीवर मात करू शकतात. जाणून घेऊ या कोणत्या सवयींमुळे स्पर्म काऊंट कमी होतो.
१) अंघोळीसाठी गरम पाणी वापरणे गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्पर्म काऊंट कमी होतो. शुक्राणू अधिक तापमान सहन करू शकत नाही, त्यामुळे ते नष्ट होतात. त्यामुळे तुमचा स्पर्म काऊंट घटतो.
२) टाइट अंडरवेअर बहुतांशी व्यक्ती या अत्यंत टाइट अंडरवेअर परिधान करतात. त्यामुळे शरीरातील अंडकोषांचे तापमान वाढते. टाइट अंडरवेअर परिधान करण्याऐवजी ढिल्ले BOXERS परिधान करण्याची सवय लावून घ्या.
३) मोबाईल फोनच्या तरंगलहरी काहींना दिवसभर मोबाईल फोन आपल्या पँटच्या खिशात घेऊन फिरण्याची सवय असते. त्यामुळे मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे पुरूषांच्या स्पर्म काऊंटवर खूप प्रभाव पडतो.
४) अतिरिक्त टेन्शन जास्त मानसिक तणाव घेतल्याने पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या लव लाइफवर पडतो.
५) मद्यपान तुम्ही जास्त दारू पित असाल तर ही खराब सवय तुमच्या शुक्राणूंची संख्या घटविण्यास कारणीभूत ठरते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com