Healthy Dry Fruits : हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ ड्राय फ्रूट्सचा समावेश, जाणून घ्या फायदे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Healthy Dry Fruits For Heart Patients : हृदय शरीराच्या कार्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या काळात खराब जीवनशैलीमुळे हृदयाशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. आधीच्या काळात हृदयविकाराचा आजार वृद्धांना होत होता, पण या धावपळीच्या काळात तरुणाई देखील हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहे.

म्हणूनच हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात ड्राय फ्रुट्सचा समावेश केला पाहिजे. ड्राय फ्रुट संतुलित प्रमाणात सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. ड्राय फ्रुट्समध्ये असलेले पोषक आणि आवश्यक गुणधर्म हृदयाला निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात. हृदयाला निरोगी ठेवणाऱ्या पदार्थांबद्दल आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

नट आणि ड्रायफ्रूट्स शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हृदयाशी संबंधित आजारांच्या बाबतीत त्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. जे लोक नियमितपणे ड्रायफ्रुट्स आणि नट्सचे सेवन करतात त्यांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी असतो. सुक्या फळे आणि नट्समध्ये भरपूर प्रमाणात निरोगी चरबी असतात, त्यांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही, तर नट आणि ड्रायफ्रूट्समध्ये जीवनसत्त्वे देखील असतात. ज्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

हृदयरोगींनी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !

बदाम

बदाम शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बदामाचे नियमित सेवन केल्याने मेंदूही निरोगी राहतो. बदामामध्ये पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि मॅग्नेशियम देखील आढळतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

अक्रोड

अक्रोड हे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड, प्रोटीन आणि फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स अक्रोडमध्ये आढळतात. याचे नियमित सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच अक्रोड खाण्याचे इतरही खूप फायदे आहेत.

शेंगदाणे

शेंगदाणे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जातात. यामध्ये उच्च प्रथिने असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करते. शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

काजू

काजू हे अनेक पोषक तत्वांसह एक शक्तिशाली ड्राय फ्रूट आहे. काजूमध्ये मॅग्नेशियम, जस्त, तांबे आणि लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय यामध्ये ओलिक अ‍ॅसिडही आढळते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

पिस्ता

पिस्ता खाल्ल्याने शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन ईसह अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. पिस्ता नियमित खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासही मदत होते.