Budh Gochar : ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. बुध हा सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन, आध्यात्मिक जीवन, वाणी, विनोद, तर्क, बुद्धिमत्ता, प्रकृती आणि त्वचा यांचा कारक मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत राजकुमार बुधाची स्थिती मजबूत आहे. त्या व्यक्ती ज्ञानी आणि बुद्धिमान असतात. तसेच हे व्यक्ती कठीण निर्णय घेण्यास सक्षम असतात.
अशातच १४ जून रोजी बुध आपली राशी बदलणार आहे. या काळात बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. पण अशा पाच राशी आहेत ज्यांना या काळात सर्वाधिक फायदा होणार आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण खूप शुभ मानले जात आहे. या काळात कार्यक्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. पदोन्नती आणि पगार वाढण्याची देखील शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ शुभ राहील, त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक संबंधांसाठीही हा काळ उत्तम राहील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल. समाजात मान-सन्मानही वाढेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायासाठी प्रवासाची शक्यता आहे. तब्येतही सुधारेल.
तूळ
बुधाचे हे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले भाग्य आणणार आहे. लांबच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनाही या काळात फायदा होणार आहे. कुटुंबात समृद्धी येईल. करिअरमध्ये प्रगती होईल. या काळात विद्यार्थ्यांनाही फायदा होईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. मान-सन्मानात वाढ होईल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश आणि सन्मान मिळेल. इच्छा पूर्ण होतील. कुटुंबातील संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनही आनंदी राहील.