मोबाईलवर वर्ल्ड कप पाहण्याचा विचार करताय ? जाणून घ्या Jio-Airtel चे स्वस्तातले रिचार्ज, सोबत 5G डेटा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : अखेर तो दिवस आला ज्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ आजपासून सुरु झाला आहे. अनेक चाहते मोबाईलवर विश्वचषकाचे सामने पाहतील. ज्यांना मोबाईलवर हे सामने पाहायचे आहेत

त्यांना अधिक डेटा असलेल्या मोबाइल रिचार्ज पॅकची गरज भासणार आहे. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या सर्व प्लॅनमध्ये डेली डेटाशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देखील मिळते. विशेष म्हणजे या सर्व रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड 5 जी डेटा देण्यात येत आहे.

*२३९ रुपयांचा रिलायन्स जिओ डेटा पॅक

रिलायन्स जिओच्या २३९ रुपयांच्या जिओ डेटा पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. जिओच्या लोकप्रिय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये ४२ जीबी डेटा मिळतो. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होतो. या प्लॅनमध्ये रोज १०० एसएमएस मिळतात. जिओच्या या रिचार्जमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

*२३९ रुपयांचा एअरटेल डेटा पॅक

एअरटेलच्या २३८ रुपयांच्या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. एअरटेलचा हा प्रीपेड पॅक अनलिमिटेड डेटा प्लॅनसोबत येतो. या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मिळतात. एअरटेलच्या पॅकमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना डेटा रोलओव्हरची सुविधा ही मिळते.

*जिओचा २४९ रुपयांचा प्रीपेड पॅक

रिलायन्स जिओच्या या प्लॅनची वैधता २३ दिवसांची आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी ४जी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये ४६ जीबी डेटा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते. या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा, जिओक्लाऊडचे सब्सक्रिप्शनही मोफत मिळते.

*२६५ रुपयांचा एअरटेलचा प्रीपेड पॅक

एअरटेलच्या प्रीपेड प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. एअरटेलच्या २६५ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी ४ जी डेटा मिळतो. या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. म्हणजेच ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल करू शकतात.

*जिओ चा २५९ रुपयांचा प्रीपेड पॅक

जिओच्या २५९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता ३० दिवस म्हणजेच १ महिन्याची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५ जी डेटा आणि रोज १०० एसएमएस मिळतात. जिओच्या पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगदेखील मिळते. रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो.

*२९९ रुपयांचा जिओ पॅक

रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा आणि रोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या पॅकमध्ये ग्राहकांना 5G डेटाचा लाभ घेता येणार आहे.

*२९९ रुपयांचा एअरटेल पॅक

एअरटेलबद्दल बोलायचे झाले तर २९९ रुपयांच्या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये रोज १०० एसएमएस मिळतात. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या पॅकमध्ये 5G डेटा मिळू शकतो.

*३४९ रुपयांचा रिलायन्स जिओ पॅक

रिलायन्स जिओच्या या पॅकची वैधता ३० दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २.५ जीबी 4G डेटा आणि दररोज 100 एसएमएस सारखे फायदे मिळतात.