अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एलॉन मस्क हे नाव तुम्ही ऐकलेच असेल, सध्याच्या काळातील ते एक सर्वात हुशार आणि व्यस्त उद्योगपती आहेत. सामान्य माणसाला मंगळ ग्रहावर पाठविण्याचे त्यांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी ते अहोरात्र मेहनत करीत आहेत.
इलेक्ट्रिक कार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टेस्ला तसेच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी कंपनी स्पेसएक्स ह्या दोन मोठ्या कंपन्यांचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. स्वतः स्थापन केलेल्या ह्या कंपन्यांमध्ये ते तंत्रज्ञ म्हणून काम पाहतात आणि अनेकदा टेस्ला किंवा स्पेसएक्सच्या उत्पादनांसाठी दिवस रात्र एक करून नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत.
दररोज ११ ते १४ तास काम करणारे एलॉन मस्क फक्त ६ तास झोपतात. त्यांना 4 मूले पण आहेत. आपल्या कुटुंबासाठी पण ते कायम वेळ राखून ठेवतात. ह्या व्यतिरिक्त ते आठवड्यातील काही दिवस व्यायाम करतात. आपल्या छंदांसाठी वेळ देतात तो वेगळाच!
आता तुम्ही म्हणाल इतका व्यस्त माणूस एवढ सगळं कस करू शकतो. एलॉन मस्क सुपरमॅन तर नाहीत ना? ते आपल्यासारखे माणूसच आहेत बर का पण त्यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही हे मात्र खरे.
प्रसिध्द उद्योजक एलॉन मस्क आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेळेच्या नियोजनासाठी ‘टाईम ब्लॉकिंग’ची (वेळ राखून ठेवण्याची) पद्धत वापरतात. एलॉन मस्क यांच्या यशामध्ये ‘टाईम ब्लॉकिंग’ पद्धतीचा नक्कीच मोठा वाटा आहे.
एलॉन मस्क ह्यांच्या यशाचे गुपित आहे ‘५ मिनिट रूल’. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवसाचे मस्क ह्यांनी आधीच नियोजन करून ठेवलेले असते. ५ मिनिटाचा एक ब्लॉक (भाग) असे पूर्ण दिवसाचे ते ५ – ५ मिनिटांच्या ब्लॉक्स (भाग) मध्ये विभाजन करतात.
कुठला ५ मिनिटाचा ब्लॉक कुठल्या कामासाठी वापरायचा हे आधीच ठरलेले असते. म्हणजे बघा एका ५ मिनिटांच्या ब्लॉक मध्ये ते ई-मेलना (रिप्लाय) प्रत्युत्तर देतात, दुसऱ्या ब्लॉक मध्ये जेवण आटोपून घेतात (अगदी ५ मिनिटांमध्येच हा! ).
किंबहुना व्यवसायासंबंधित मिटींग्स पण कमी वेळामध्ये आटोपून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसेच काम सुरु असताना मधेच समजा फोन आला तरी तो उचलण्याचा ते टाळतात.
एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या हातात खूप कमी वेळ असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमची पूर्ण शक्ती पणाला लावता. थोडक्यात तुमची उत्पादनक्षमता वाढते आणि ते काम पूर्ण होण्याची शक्यता वाढते. तसेच कोणते काम कधी करायचे हे आधीच ठरविलेले असल्यामुळे तुमचे मन हातात असणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतले जाते आणि इतर गोष्टींविषयी विचार मनात येणे बंद होते. थोडक्यात तुमची एकाग्रता वाढते.
असा करा फॉलो ५ मिनिट रूल