लाईफस्टाईल

White Gold : ह्या देशाला मिळाली ‘पांढऱ्या सोन्याची खाण ! देशभरातील लोकांचे आयुष्य बदलणार

Published by
Ahmednagarlive24 Office

White Gold : पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने आणि विविध औद्योगिक कारणांसाठी जाळला जाणारा कोळसा, यामुळे जगासमोर वाढत्या कार्बन उत्सर्जनाचे खूप मोठे संकट उभे ठाकले आहे.

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आतापासूनच ठोस प्रयत्न केले गेले नाहीत तर जगाचा विनाश अटळ आहे, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या पर्यायी इंधनांवर संशोधन सुरू आहे.

विजेवर चालणारी वाहने हा एक पर्याय म्हणून समोर आला आहे. या वाहनांसाठी ज्या बॅटरीची गरज असते. त्यामध्ये लिथियम हा धातू वापरला जातो. त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेटनाही बॅटरीची आवश्यकता असते.

साहजिकच जगभरातून लिथियमला वाढती मागणी आहे. म्हणूनच लिथियमला ‘व्हाईट गोल्ड’ अर्थात पांढरे सोने असे म्हटले जात आहे. या व्हाईट गोल्डबद्दलच्या एका वृत्ताने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेमध्ये व्हाईट गोल्डचा अर्थात लिथियमचा प्रचंड मोठा साठा आढळला आहे, असा दावा एका वेबसाईटने केला आहे.

अमेरिकेतील नेवाडा- ऑरेगॉन सीमेवरील मॅकडर्मिट कॅल्डेरा या ठिकाणी लिथियमचा हा प्रचंड मोठा साठा आहे, असा दावा वेबसाईटने केला आहे. अमेरिकेत सापडलेल्या या खजिन्याशी संबंधित प्रकल्प ‘लिथियम नेवाडा’च्या ताब्यात आहे.

लिथियम नेवाडाने लिथियमच्या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. असे अनुमान आहे की, या परिसरात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बनलेले एक प्रचंड मोठे विवर आहे. या विवराच्या दक्षिणेकडील काठावर लिथियमचा सर्वाधिक साठा आहे. या ठिकाणी सुमारे २० ते ४० दशलक्ष टेन लिथियम असावे.

Ahmednagarlive24 Office