लाईफस्टाईल

हे आहे नरकाचे दार ! जिथे गेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत येत नाही…

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल ऐकूण आपण थक्क होतो. जगातील एक ठिकाण समोर आले असून याठिकाणी गेलेली कोणतीही व्यक्ती पुन्हा जिवंत येत नाही. त्यामुळे लोक या ठिकाणाला नरकाचे द्वार असेच म्हणतात.

तुर्की मधील हेरापोलिसमध्ये असलेले हे ठिकाण अनेक वर्षे रहस्यमय बनले होते, कारण लोकांचा असा विश्वास होता की, येथे येणारे लोक युनानी देवाच्या विषारी श्वासामुळे मरण पावतात.

म्हणजेच मृत्यूच्या देवतेचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक वर्षांपासून असे मानले जात होते की, मृत्यूच्या देवाच्या विषारी श्वासामुळे मंदिरात किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्यांचा मृत्यू होतो.

वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे या ठिकाणाला लोकांनी नरकाचा दरवाजा, असे नाव दिले आहे. मात्र, अनेक वर्षांनंतर शास्त्रज्ञांना याठिकाणी वारंवार होणाऱ्या मृत्यूचे खरे कारण सापडले. या मंदिराच्या खालच्या दिशेने विषारी कार्बन डायऑक्साईड वायू सतत बाहेर पडतो.

अशा परिस्थितीत माणूस किंवा प्राणी त्याच्या संपर्कात आल्यास त्याचा मृत्यू होतो. कार्बनडाय ऑक्साईड वायू इतका धोकादायक आहे की, केवळ १० टक्के वायूने ३० मिनिटांत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. या मंदिराच्या गुहेत कार्बन डायऑक्साईडसारख्या विषारी वायूचे प्रमाण ९१ टक्के असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधून काढले.

हेरापोलिस हे शहर पठारावर वसलेले एक प्राचीन रोमन शहर आहे. छोट्याशा जागेत या शहरात खूप वैविध्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतात. येथे बनवलेले गरम पाण्याचे स्रोत हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे.

ते कॅल्शियमने समृद्ध आहेत आणि या ठिकाणी पाण्याचे बुडबुडे सतत वाढत राहतात, म्हणूनच दुसऱ्या शतकात हे शहर थर्मल स्पा म्हणून प्रसिद्ध होते. या शहरात दूरदूरहून लोक त्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी येत असत. हे शहर विशेषतः सांधे आणि त्वचेशी संबंधित रोगांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध होते.

Ahmednagarlive24 Office