हे आहे जगातील सर्वात डेंजर जंगल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
लंडन : जगाच्या पाठीवर अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. काही ठिकाणे अशी आहेत, जिथे तुम्हाला शांती व आल्हाददायक वाटेल, तर दुसरीकडे काही अशाही जागा आहेत, जिथे जाण्याच्या नावानेच अंगावर काटा येईल. रोमानियाच्या ट्रान्सल्वेनिया प्रांतामध्येही असेच एक ठिकाण आहे.
तिथे सतत काहीतरी चित्रविचित्र घटना घडत असतात. ‘होया बस्यू’ नावाचे हे जंगल जगातील सर्वात भयावह जंगलांपैकी एक आहे. तिथे घडणाऱ्या रहस्यमयी घटनांमुळे त्यास रोमानियाचा बम्र्युडा ट्रँगल असेही म्हटले जाते. हे कुप्रसिद्ध जंगल क्लुज प्रांतात असून ते क्लुज-नेपोका शहराच्या पश्चिमेला आहे.
सुमारे ७०० एकरांवर पसरलेल्या या जंगलात शेकडो लोक बेपत्ता झाल्याचे सांगितले जाते. या जंगलातील झाडे वाकलेली व वेडीवाकडी आहेत. ती दिवसाच्या उजेडातही अतिशय भयावह वाटतात. होया बस्यू जंगल परिसरात एक गुराखी अचानक गायब झाल्यानंतर लोकांमध्ये पहिल्यांदा या जंगलाबाबत उत्सुकता वाढली होती.
पुरातन कथांनुसार, गूढरित्या गायब झालेल्या गुराख्यासोबत त्यावेळी २०० मेंढ्यासुद्धा होत्या. काही वर्षांपूर्वी एका लष्करी अधिकाऱ्याने या जंगलात एक उडती तबकडी पाहिल्याचा दावा केला होता.
याशिवाय १९६८मध्येही एमिल वरनिया नावाच्या एका व्यक्तीने तिथे आकाशामध्ये एक अलौकिक शरीर पाहिल्याचा दावा केला होता. तिथे फिरण्यास आलेल्या काही पर्यटकांनी काहीशा अशाच प्रकारच्या घटनांचा उल्लेख केला होता.
अहमदनगर लाईव्ह 24