लाईफस्टाईल

Longest Bridges In The World : हा आहे जगातील सर्वाधिक लांबीचा पूल !

Published by
Ahmednagarlive24 Office

Longest Bridges In The World : जगावेगळं काहीतरी करून संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्यामध्ये चीनचा हात कोणीही धरू शकत नाही. आता हेच पहा ना, अवघ्या नऊ वर्षांत जगातील सर्वाधिक लांबीचा ब्रिज उभारणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ‘शक्य आहे’, असंच येईल.

हा जागतिक विक्रम चीनने आपल्या नावावर केला. तसं पाहिलं तर जगभरात अशी अनेक स्मारकं आहेत की, याचं संपूर्ण श्रेय हे अभियंत्यांना निर्विवाद दिलं पाहिजे.

बांधकामाचे अद्वितीय नमुने पाहताना डोळ्यांची पारणेच फिटतात. यापैकीच ‘हाँग काँग झुहाई मकाऊ ब्रिज’ समुद्रामध्ये उभा केलेला भव्य दिव्य असा ब्रिज तब्बल ५५ किमी लांबीचा असून यापैकी ६.७ किमीच्या भागात चक्क बोगदा करण्यात आला आहे.

साधारणपणे २००९ मध्ये उभारण्यास सुरुवात केलेला हा ब्रिज २०१८ मध्ये पूर्ण झाला. यामुळे चीनसह देश-विदेशामधील अनेक पर्यटकांमधून चीनचे कौतुक होत आहे. समुद्रावर बांधकाम करण्यात आलेल्या या अवाढव्य ब्रिजसाठी तब्बल ४ लाख टन स्टिल आणि ७० अरब इतका निधी खर्ची चालण्यात आला.

तसेच हा ब्रिज अनेक कृत्रिम आयलँडवर उभा करण्यात आला आहे. यामुळे कितीही मोठा भूकंप झाला किंवा कितीही समुद्री लाटा धडकल्या तरी या बिजला हानी पोहोचणार नाही. एवढ्या सामग्रीमध्ये जगप्रसिद्ध फ्रान्सच्या आयफेल टॉवरसारखे आणखी ६० टॉवर नवीन उभे राहिले असते, यावरून या ब्रिजची भव्यता समजण्यास मदत होते.

Ahmednagarlive24 Office