Vatican City : जगातला सर्वांत छोटा देश म्हणून व्हॅटिकन सिटीला मान्यता आहे परंतू त्याही पेक्षा छोटा देश इंग्लडच्या जवळ आहे. या देशाचे नाव आहे ‘सीलँड’. या देशाची लोकसंख्या आहे अवघी २७.
महत्त्वाचे म्हणजे या देशाचे स्वतंत्र चलन आणि राष्ट्रध्वजही आहे. असे असूनही या देशाची बांधणी मानवाकडून कृत्रिमरित्या झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला देश म्हणून मान्यता मिळालेली नाही. परंतू गिनेज बुकात या देशाची नोंद सर्वात छोटा देश परंतू स्विकृतीच्या प्रतिक्षेत अशी नोंद आहे.
व्हॅटिकन सिटी या भागाला स्वतंत्र देश म्हणून जगाची मान्यता आहे. ‘सीलँड’ च्या बाबतीत मात्र अशी मान्यता नाही. इंग्लंडच्या उत्तर समुद्रातला हा एक निव्वळ फलाट आहे. दोन खांबांवर असलेला फलाट म्हणजे सीलँड देश. अधिकृतरित्या या देशाला ‘प्रिन्सिपलिटी ऑफ सीलँड असे म्हटले जाते. इंग्लंडपासून अवघ्या १० किलोमीटरवर हा देश आहे.
या देशातली इमारत म्हणजे फक्त कंटेनर या देशाला फक्त पंतप्रधान नाही. दुसऱ्या महायुध्दात जर्मन सैन्याकडून या देशाचे संरक्षण इंग्लडने केले. दुसऱ्या महायुध्दादरम्यानच या देशाची निर्मिती झाली. इंग्लंडच्या समुद्र हद्दीच्या बाहेर सीलँड बसलेले होते. महायुध्दानंतर हा प्लॅटफॉर्म पाडला जाणार होता.
परंतू इंग्लंडने आपली समुद्र हद्द वाढवत या फलाटाला देशाच्या सीमेत समाविष्ट केले. १९४३ मध्ये एचएम. फोर्ट इस यांनी या फलाटाची निर्मिती केली. १९६७ मध्ये पॅडी रॉय बेटस हे या देशाचे मालक झाले. त्यांना फलाटावरुन पायरेट रेडिओ ब्रॉडकास्ट करायचे होते. यासाठी फलाटाला त्यांनी देश म्हणून घोषित केले. परंतु त्यांना या फलाटावर कधीच रेडिओ केंद्र सुरु करता आले नाही.
कशासाठी बांधला?
दुसऱ्या महायुध्दात पाण सुरुंग पेरणाऱ्या विमानांना पाडण्यासाठी या फलाटाची बांधणी इंग्लंडने केली. दुसऱ्या महायुध्दादरम्यान फलाटावर २०० ते ३०० नौसैनिक तैनात होते. १९५६ मध्ये या फलाटावरुन शेवटचा सैनिक उतरला.
तिकिट, फुटबॉल संघ
बॅटसने यांनी देशाचा पासपोर्ट तयार केला. २२ वर्षांपूर्वीचे पासपोर्ट रद्द करुन नवे तयार केले. या पासपोर्टला युरोपियन देशांनी मान्यता दिली नाही. परंतू अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि रशिया, इराक- जर्मनीमध्ये पैशांची अफरातफर करणाऱ्यांनी या पासपोर्टची खरेदी करुन त्याची किंमत वाढवली. २००७ ते २०१० मध्ये या देशाला विक्रीस काढण्यात आले.
फलाटासाठी भांडाभांड
१९७५ मध्ये बॅटसने देशाला स्वतंत्र ध्वज, राष्ट्रगीत, पासपोर्ट आणि चलन मिळवून दिले. १९७८ मध्ये अलेक्झांडर आयखेनबाख याने स्वतःला या देशाचा पंतप्रधान म्हणून घोषित केले. दरम्यान ऑस्ट्रीयात बॅटस् आणि आयखेनबाख यांच्याच बैठक झाली. फलाटाच्या विक्रीसंदर्भात मात्र बॅटस् यांनी तिथे आलीशान हॉटेल आणि कॅसिनो सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला.
परंतू आयखेनबाखला हा प्रस्ताव पसंत पडला नाही. त्याने आणि अनेक जर्मन आणि डच भाडोत्री सैनिकांच्या मदतीने फलाटावर हल्ला केला. बॅटस् यांचा मुलगा मायकल याला ओलीस ठेवले. परंतू मायकलने स्वतःची सुटका करुन घेत आयखेनवाख आणि सैनिकांना पकडले. आयखेनबाख हा जर्मन वकिल होता. त्याला सीलंड या देशाविरोधात उठाव केल्याप्रकरणी ७५ हजार डॉलर्सचा दंड ठोठावला. त्याची सुटका करण्यासाठी जर्मनीला राजदूत पाठवावा लागला.