ही छोटी-शी वस्तू आहे पोटदुखी पासून ते सर्दीपर्यंत आजाराचे रामबाण औषध !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  मित्रानो सर्दी होणे हे सामान्य आहे. आणि तेव्हाच आहारामध्ये थोड्याश्या निष्काळजीपणामुळे पोटदुखीचा त्रास देखील सुरू होतो.

थंड हवा जेव्हा वाहू लागते तेव्हा शरीरात आणि विशेषत: सांध्यामध्ये वेदना वाढतात. या सामान्य आजारांकरिता डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा घरगुती उपचार करणे अधिक चांगले. तीव्रता वाढल्यास, डॉक्टरकडे जा. आज आपण स्वयंपाकघरात ठेवलेल्या

अशाच एका वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत जो बऱ्यापैकी रोगांचा रामबाण उपाय आहे. काळे जिरे हे अनेक आजार बरे करतात.

आपण त्याला घरगुती उपचार म्हणून वापरू शकतो. काळे जिरे अन्नाची चव वाढवतात, तर त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून रोगांविरूद्ध लढा देतात. काळे जीरे खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते आणि थकवा व अशक्तपणा दूर होतो.

काळे जिरे सर्दी आणि खोकल्यासाठी रामबाण उपाय आहे. आपण काळे जिरे भाजून सर्दी आणि कफच्या झाल्यावर ते रुमाल बांधून घ्या. आणि त्याचा वास घेत रहा ज्याने सर्दी आणि कफ पासून आराम मिळतो. याशिवाय काळे जिरे डांग्या खोकला, दमा आणि अस्थमा सारख्या श्वसन रोगांना कमी करण्यास मदत करत.

काळे जिरे पचनक्रियाचे आजार दूर करतात. यात अँटीमाइक्रोबियल आढळते, ज्यामुळे पाचन समस्या दूर होतात. काळे जिरे घेतल्यामुळे पोटदुखी, अतिसार, पोटात जंत, जठरासंबंधी इत्यादी कमी होतात. सतत डोकेदुखीच्या समस्येमध्ये काळे जिरे देखील उपयुक्त आहे.

कपाळावर काळ्या जिऱ्याचे तेल लावल्याने डोकेदुखी कमी होते. एवढेच नाही तर काळे जिरे दातदुखी देखील कमी करतात. दातदुखी असल्यास, काळ्या जिऱ्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात टाका आणि गुळण्या करा. यामुळे आपल्या दातदुखीस त्वरित आराम मिळेल.

काळे जिरे वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतात. सतत तीन महिने काळ्या जिऱ्याचे सेवन करून तुमचे वजन कमी होऊ शकते. मग आपण कशाची वाट पाहत आहात? जर तुम्ही अद्याप काळ्या जिऱ्याला आपल्या आहाराचा एक भाग बनविला नसेल तर आजपासून सुरुवात करा.

अहमदनगर लाईव्ह 24