अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगणार आहोत,
कारण एका खासगी बँकेने आपल्या एफडी वरील व्याजदरात बदल केला आहे. खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात नुकतेच बदल केलेत. हा बदल 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडींवर लागू होईल.
बँकेचे नवे दर 16 नोव्हेंबरपासून लागू झालेत. काय असणार आहे व्याजदर ? जाणून घ्या बदलानंतर ICICI बँक 7 ते 14 दिवसांत मुदत ठेवींवर (FD) 2.50 टक्के व्याज देणार आहे.
15 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के दराने व्याज दिले जाईल आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3 टक्के व्याज दिले जाईल. ICICI बँक 91 ते 184 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.5 टक्के व्याज मिळेल.
185 ते 289 दिवसांत मुदत ठेवींवर 4.4 टक्के दराने व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना नियमित ग्राहकांपेक्षा मुदत ठेवींवर 0.50 टक्के अधिक व्याज मिळते. ताज्या बदलांनंतर ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 3% ते 6.3% व्याज मिळेल.