‘या’ रेशन कार्ड धारकांना बसणार मोठा धक्का, रेशन कार्ड होणार बंद, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरीब जनतेसाठी रेशनिंगची योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील गरीब जनतेला रास्त भावात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. रेशन कार्ड धारकांना या योजनेच्या माध्यमातून स्वस्तात अन्नधान्य मिळत आहे.

विशेष बाब म्हणजे कोरोना काळापासून देशभरातील सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य पुरवले जात आहे. यामुळे समाजातील वंचित आणि गरीब नागरिकांना मोठा फायदा होत आहे. पण शासनाच्या या योजनेचा अनेक लोकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उचलला असल्याचे अलीकडे उघडकीस आले आहे.

अशा परिस्थितीत आता केंद्र शासनाने ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड वर स्वस्त धान्याचा लाभ घेतला आहे त्या लोकांचे रेशन कार्ड बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजे जे लोक स्वस्त धान्य घेण्यासाठी अपात्र ठरणार आहेत अशा लोकांच रेशन कार्ड आता रद्द केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान आज आपण कोणते लोक रेशन कार्ड साठी अपात्र राहणार आहेत, या लोकांना काय करावे लागेल? अपात्र लोकांवर कोणती कारवाई होऊ शकते? याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणते रेशनकार्ड धारक ठरणार अपात्र

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या रेशन कार्ड धारकांकडे 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट/दुकान, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, स्वत:च्या उत्पन्नातून खरेदी केलेला शस्त्र परवाना आहे असे लोक रेशन कार्डच्या माध्यमातून स्वस्त धान्य घेण्यासाठी अपात्र ठरणार आहेत. तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न ग्रामीण भागात 2 लाख असेल आणि शहरात 3 लाख रुपये असेल असे लोक देखील स्वस्त धान्यासाठी अपात्र ठरणार असून अशा लोकांचे रेशन कार्ड आता रद्द केले जाणार आहे.

अपात्र रेशन कार्ड धारकांना काय करावे लागेल?

जे लोक रेशन कार्डसाठी अपात्र ठरले असतील त्यांना आपले कार्ड तहसील कार्यालयात जमा करावे लागणार आहे. यासाठी अशा अपात्र लोकांना एक विहित नमुन्या मधील अर्ज भरावा लागणार आहे आणि हा अर्ज तसेच शिधापत्रिका जवळच्या स्वस्त धान्य दुकानात किंवा तहसील कार्यालयात जमा करायची आहे.

रेशन कार्ड जमा न केल्यास काय होणार?

अपात्र लोकांनी आपले रेशन कार्ड तहसील कार्यालयात किंवा स्वस्त धान्य दुकानात जमा केली नाही तर अशा लोकांवर पडताळणी केल्यानंतर कारवाई केली जाईल आणि शिधापत्रिका रद्द होईल. या अशा अपात्र लोकांवर पडताळणीनंतर कायदेशीर कारवाई तर होणारच आहे शिवाय त्यांनी आत्तापर्यंत जेवढे रेशन स्वस्तात घेतले असेल ते सर्व रेशन त्यांच्याकडून वसूलही केले जाणार आहे.