वृत्तसंस्था : सोशल मीडियाचा अतिवापर आपल्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे याआाधीच्या विविध अध्ययनांतून समोर आले आहे. मात्र किशोरवयीन मुलांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत हा धोका जास्त असतो, असे एका अध्ययनातून समोर आले आहे.
ब्रिटनमधील द लॅन्सेट चाइल्ड अँड ॲडॉल्संट हेल्थ या संस्थेने केलेल्या सर्वक्षणातून हा खुलासा झाला आहे. या सर्वेक्षणात १३ ते १६ वयोगटातील दहा मुलांचा समावेश करण्यात आला होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या मानसिकतेवर सोशल मीडियाचा जास्त परिणाम होत असल्याचे या अध्ययनात शास्त्रज्ञांनी आढळून आले.
सोशल मीडियावर होणाऱ्या रॅगींगचा मुली मोठ्या प्रमाणावर बळी ठरतात. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील काही प्रेरणाद्याक पोस्ट फायदेशीर असतात. मात्र काही आक्षेपार्ह पोस्टमुळे त्या पाहणाऱ्यांना त्रास होतो.
अशा लोकांमध्ये खासकरून किशोरवयीन मुलामुलींचा समावेश असतो. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करण्याच्या कालावधीसोबतच त्यावर कोणत्या गोष्टी फॉलो केल्या जातात, हेदेखील महत्त्वाचे असल्याचे अध्ययनातून सांगण्यात आले